नवी दिल्ली : युद्धाच्या काळात आपण सैनिकांना नाराज करू नका. थोडे पुढे पाऊल टाकून डॉक्टरांच्या तक्रारींवर तोडगा काढा आणि त्यासाठी अतिरिक्त निधीची तरतूद करा, अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयानेसरकारला यावर उपाय करायला सांगितला.
न्या. अशोक भूषण, न्या. संजय किशन कौल आणि न्या. एम. आर. शाह यांच्या पीठाने व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सुनावणी केली. डॉक्टरांच्या समस्यांबाबत ही याचिका दाखल झाली आहे. न्यायालयाने म्हटले आहे की, अशा बातम्या येत आहेत की, अनेक क्षेत्रात डॉक्टरांना वेतन दिले जात नाही. आम्ही अशा बातम्या पाहिल्या आहेत की, डॉक्टर संपावर आहेत. दिल्लीत काही डॉक्टरांना तीन महिन्यांपासून वेतन नाही. याकडे लक्ष द्या. यात न्यायालयाच्या हस्तक्षेपाची गरज पडू नये.
एका डॉक्टरांनी याबाबत याचिका दाखल केली आहे. यात असा आरोप केला आहे की, कोरोनाविरुद्धच्या लढाईत पहिल्या रांगेत असलेल्या योद्ध्यांना वेतन दिले जात नाही. वेतनात कपात केली जात आहे. वेतनाला विलंब होत आहे.
अतिरिक्त निधीची तरतूद करा
न्यायालयाने म्हटले आहे की, युद्धात सैनिकांना नाराज केले जात नाही. या तक्रारींवर तोडगा काढण्यासाठी अतिरिक्त निधीची तरतूद करा. केंद्राकडून सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले की, जर काही चांगल्या सूचना मिळाल्या तर त्याबाबत विचार केला जाईल. याचिकाकर्त्यांकडून वरिष्ठ वकील के. व्ही. विश्वनाथन यांनी सांगितले की, जर कोरोनाची ड्यूटी करीत असलेल्या डॉक्टरांना हॉस्पिटलजवळ निवासाची व्यवस्था केली नाही तर, त्यांच्या कुटुंबियाला संसर्गाचा धोका आहे. डॉक्टर आणि कर्मचारी यांना पीपीई कीटशिवाय संसर्गाचा धोका अधिक आहे.
डॉक्टरांचे वेतन कपात केले जात आहे. खासगी हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या वेतनातही कपात व्हायला नको. पुढील सुनावणी १७ जून रोजी होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
"तुम्हाला रस्त्यावर फोडून काढल्याशिवाय गप्प बसणार नाही"; मनसेने दिला इशारा
CoronaVirus News : कोरोनाचा उद्रेक! देशातील रुग्णसंख्येने गाठला नवा उच्चांक; धडकी भरवणारी आकडेवारी
CoronaVirus News : कोरोनाचा धोका वाढतोय! 'ही' दोन लक्षणं असल्यास वेळीच व्हा सावध; नाहीतर...
Jammu And Kashmir : कुलगाम चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा; सर्च ऑपरेशन सुरू
CoronaVirus News : काय सांगता? PPE किट घालून कोरोनाग्रस्त आरोपीने रुग्णालयातून काढला पळ
CoronaVirus News : लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्र्यांनी केला मोठा खुलासा, म्हणाले...