शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

CoronaVirus News: अब तक ९! कोविशील्ड लस घेतलेल्यांसाठी महत्त्वाची बातमी; लवकरच मोठा दिलासा अपेक्षित

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2021 1:18 PM

CoronaVirus News: युरोपच्या ग्रीन पाससाठी भारत सरकारचे प्रयत्न सुरू

नवी दिल्ली: देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. त्यामुळे देशात लसीकरण मोहिमेला वेग दिला जात आहे. भविष्य काळात परदेशी प्रवास करताना लसीकरण महत्त्वाचं ठरणार आहे. अनेक बड्या देशांनी अद्याप कोवॅक्सिन आणि कोविशील्डला मान्यता दिलेली नाही. त्यामुळे भारतातून परदेशांमध्ये जाणाऱ्या प्रवाशांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. 

कोवॅक्सिन, कोविशील्ड लसींना युरोपियन युनियनमध्ये मान्यता मिळावी यासाठी मोदी सरकारनं आक्रमकपणे प्रयत्न सुरू केले आहेत. आतापर्यंत ऑस्ट्रिया, जर्मनी, स्लोवेनिया, ग्रीस, आईसलँड, आर्यलंड, स्पेन, इस्टोनिया, स्वित्झर्लंड यांनी कोविशील्ड लसीला मंजुरी दिली आहे. इस्टोनियामध्ये कोविशील्डसोबतच कोवॅक्सिन घेतलेल्या भारतीय नागरिकांना कोणतीही बंधनं नसतील. एएनआयनं सुत्रांच्या हवाल्यानं हे वृत्त दिलं आहे.

युरोपमध्ये भारतीयांना प्रवेश मिळणार?युरोपियन युनियननं आपल्या ग्रीन पास योजनेच्या अंतर्गत प्रवासावरील निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामुळे कोविशील्ड आणि कोवॅक्सिनची लस घेतलेल्या भारतीयांना युरोपचा प्रवास करू द्या, असं आवाहन भारत सरकारकडून युरोपियन युनियनला करण्यात आलं आहे. युरोपियन युनियनमध्ये २७ देशांचा समावेश आहे. 'ग्रीन पास असलेल्या युरोपियन नागरिकांना आम्ही अनिवार्य क्वारंटिनमधून सवलत देऊ. पण यासाठी एक अट आहे. तुम्ही कोविशील्ड आणि कोवॅक्सिनला मंजुरी द्या,' असं भारताकडून युरोपियन युनियनला सांगण्यात आलं आहे. 

कोविन पोर्टलच्या माध्यमातून जारी करण्यात आलेलं लसीकरण प्रमाणपत्र स्वीकारण्याची विनंती भारताकडून युरोपियन युनियनला करण्यात आली आहे. युरोपियन युनियनची डिजिटल कोविड प्रमाणपत्र योजना म्हणजेच 'ग्रीन पास' योजना गुरुवारपासून लागू होईल. या माध्यमातून नागरिकांना प्रवास करता येईल.

ग्रीन पास योजना म्हणजे काय?युरोपियन वैद्यकीय संस्थेनं (ईएमए) मंजुरी दिलेल्या लसी घेतलेल्या लोकांना युरोपियन युनियनमध्ये प्रवास करताना विशेष सवलत देण्यात येणार आहे. ईएमएनं मंजुरी दिलेल्या न दिलेल्या लसी घेतलेल्या व्यक्तींना ग्रीन पास योजनेचा लाभ घेता येणार नाही. कोविशील्ड आणि कोवॅक्सिनचा समावेश ग्रीन पास योजनेत करण्यात आलेला नाही. भारतात लसीकरणात याच दोन लसींचा प्रामुख्यानं वापर होत आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या