नवी दिल्ली: देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट आता ओसरली आहे. मे महिन्यात देशात कोरोनानं हाहाकार माजवला. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देशात दररोज ४ लाखांहून नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर कोरोनाची लाट ओसरू लागली. महिना संपेपर्यंत दररोज आढळून येत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या ४ लाखांच्या खाली आली. यानंतर आता तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियानं याबद्दल एक अहवाल प्रसिद्ध केला आहे.आपलेही झाले परके! पतीचा मृत्यू झाल्यानंतर कुटुंबाने फिरवली पाठ; पत्नीने दिला मुखाग्नीकोरोनाची तिसरी लाट दुसऱ्या लाटेइतकीच भीषण असेल आणि तिचा जोर ९८ दिवस कायम राहील, अशी आकडेवारी एसबीआयच्या अहवालातून समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय अनुभव आणि तिथली आकडेवारी लक्षात घेऊन एसबीआयनं अहवाल तयार केला आहे. 'तिसऱ्या लाटेची तीव्रता दुसऱ्या लाटेपेक्षा फारशी वेगळी नसेल. मात्र व्यवस्थित पूर्वतयारी केल्यास जीवितहानी कमी करता येऊ शकेल,' असं एसबीआयनं अहवालात नमूद केलं आहे.कोव्हॅक्सिन लस घेतलेले विद्यार्थी अडचणीत; अनेकजण द्विधा मनस्थितीत'जगातील प्रमुख देशांचा विचार केल्यास तिसऱ्या लाटेचा कालावधी साधारणत: ९८ दिवसांचा राहिला आहे. तर दुसरी लाटेची तीव्रता सरासरी १०८ दिवस पाहायला मिळाली आहे,' अशी आकडेवारी एसबीआयच्या अहवालात आहे. एप्रिल-मेमध्ये देशात कोरोनाची दुसरी लाट आली. मे महिन्यात लाटेनं टोक गाठलं. मेच्या पहिल्या आठवड्यात जवळपास दररोज ४ लाख कोरोना रुग्ण आढळून येत होते. मे महिन्यात देशात ९० लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंत कोणत्याच देशात एका महिन्यात इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून आलेले नाहीत. गेल्या महिन्यात देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या १.२ लाखांहून अधिक आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशात एकूण १.७ लाख लोकांचा मृत्यू झाला. तिसऱ्या लाटेसाठी योग्य तयारी केल्यास हाच आकडा ४० हजारांपर्यंत आणता येईल. दुसऱ्या लाटेदरम्यान प्रकृती गंभीर असलेल्या रुग्णांचं प्रमाण २० टक्के होतं. तिसऱ्या लाटेदरम्यान ते ५ टक्क्यांवर राहिल्यास जीवितहानी मोठ्या प्रमाणात टाळता येईल, असं अहवालात नमूद करण्यात आलं आहे. यासाठी आरोग्य सुविधा उभारण्यावर आणि लसीकरण मोहिमेला गतीमान करण्यावर लक्ष केंद्रीत करणं गरजेचं आहे.
CoronaVirus News: कोरोनाची तिसरी लाट किती भीषण? किती दिवस राहणार?; समोर आली महत्त्वाची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2021 11:50 AM