मुंबई: कोरोना संकटावर मात करण्यासाठी आणि अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलेल्या आत्मनिर्भर भारत पॅकेजमध्ये सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी भरीव तरतूद असून याचा मोठा फायदा देशाला होईल, असं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी व्यक्त केलं. पुढील वर्षात आम्ही ५ कोटी रोजगार निर्माण करण्याचं लक्ष्य ठेवलं असून सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांमुळे ते प्रत्यक्षात उतरेल, असा विश्वास गडकरींनी व्यक्त केला. लोकमतनं आयोजित केलेल्या ‘पुनश्च भरारी - आव्हाने आणि संधी’ या वेबिनारमध्ये गडकरी बोलत होते. यावेळी लोकमत माध्यम समूहाचे चेअरमन विजय दर्डा यांनी गडकरींशी संवाद साधला.कोरोनामुळे ठप्प झालेल्या उद्योगांना, अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या 'आत्मनिर्भर भारत' पॅकेजवर गडकरींनी भाष्य केलं. 'आत्मनिर्भर भारत पॅकेज म्हणजे एमएसएमईचं धोरण नव्हे. देशाच्या जीडीपीत एमएसएमईचं योगदान सध्या २९ टक्के आहे. ते ५० टक्क्यांवर नेण्याचं लक्ष्य आहे. सध्या ४८ टक्क्यांवर असलेली निर्यात ६० टक्क्यांवर नेण्याचं आमचं उद्दिष्ट आहे,' असं गडकरी म्हणाले.कोरोनामुळे देशावरच नव्हे, तर जगावर संकट आलं आहे. मात्र या संकटाचं संधीत रुपांतर करुन आत्मनिर्भर भारताची निर्मिती करणार असल्याचं गडकरींनी म्हटलं. यासाठीचा रोडमॅपदेखील त्यांनी सांगितला. आपण जवळपास २०० परदेशी कंपन्यांना निविदा प्रक्रियेत सहभाग घेण्यापासून मज्जाव केला आहे. ती कामं आता भारतीय एमएसएमईंना मिळतील. त्यामुळे रोजगार वाढतील. गरिबांच्या हाती पैसा येईल. त्यामुळे गरिबी दूर होईल, अशा शब्दांमध्ये गडकरींनी सरकारची योजना थोडक्यात सांगितली. मुंबई एमएसएमई स्टॉक एक्स्चेंज सुरू करण्याचा विचार असून त्यामुळे एमएसएमई क्षेत्राला उभारी मिळेल, असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला.पुढच्या वर्षात आम्ही ५ कोटी रोजगार निर्माण करू. त्यामध्ये एमएसएमईचा सिंहाचा वाटा असेल, असं गडकरी म्हणाले. पाच ट्रिलियनची अर्थव्यवस्था तयार करण्यात आत्मनिर्भर भारत पॅकेजचं योगदान मोठं असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बऱ्याचशा मोठ्या कंपन्यांनी एमएसएमई उद्योगांचे पैसे थकवले आहेत. हा आकडा ५ ते ६ लाख कोटींच्या घरात आहे. या कंपन्यांनी ४५ दिवसांमध्ये थकलेले पैसे द्यावेत, असे आदेश देण्यात आल्याची माहिती गडकरींनी सांगितली.कोरोना संकटानंतरची आव्हानं आणि संधी या विषयावर लोकमतनं आयोजित केलेल्या ‘एम्ब्रेसिंग दी न्यू नॉर्मल - द फ्यूचर ऑफ एमएसएमई सेक्टर’ या वेबिनारमध्ये नितीन गडकरी यांच्यासह ‘नरेडको’ आणि ‘असोचेम’चे अध्यक्ष निरंजन हिरानंदानी, पुनावाला फायनान्सचे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अभय भुतडा, ‘ऑल इंडिया मॅन्युफॅक्चरिंग ऑर्गनायझेशन’चे माजी अध्यक्ष के. ई. रघुनाथन यांनी मार्गदर्शन केलं. ...म्हणून त्यावेळी मला खूप दु:ख झालं; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी व्यक्त केली खंतकोरोना व्हायरस नैसर्गिक नाही; तो प्रयोगशाळेत तयार झालाय, नितीन गडकरींचं रोखठोक विधानमोदींनी दिलेला आधार उद्योगजगत कधीही विसरणार नाही- नितीन गडकरी
पुढच्या वर्षात 5 कोटी रोजगार; नितीन गडकरींनी सांगितलं MSME पॅकेज कसं चमत्कार करणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 3:02 PM