नवी दिल्ली: देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना दिसत आहे. मात्र अद्यापही परिस्थितीत पूर्णपणे नियंत्रणात आलेली नाही. देशात दररोज कोरोनाचे दोन लाखांहून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. गेल्या महिन्याभरात देशात कोरोनानं अक्षरश: हाहाकार माजवला. ऑक्सिजन सिलिंडरसाठी रुग्णांच्या नातेवाईकांची धावाधाव सुरू होती. काही ठिकाणी ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे अनेकांचे जीव गेले. त्यामुळे आता ऑक्सिजन सज्ज राहण्यासाठी केंद्र सरकार महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.शुभसंकेत! कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील 'पॉझिटिव्ह' गोष्टी; देशासाठी १० आनंदाच्या घडामोडीकोरोनाविरुद्धच्या रामबाण ठरू शकणाऱ्या 2-डीजी औषधाला उपचारांमध्ये वापरण्याची परवानगी लवकरच मिळण्याची शक्यता आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करताना 2-डीजी औषध वापरायचं का, याबद्दल कोविड-19 नॅशनल टास्क फोर्स अभ्यास करेल, अशी माहिती नीती आयोगाचे सदस्य असलेले डॉ. व्हि. के. पॉल यांनी दिली. ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियानं या औषधाच्या आपत्कालीन वापरास मंजुरी दिली आहे....म्हणून कोरोनाकाळात श्रीमंत भारतीय देश सोडून स्वीकारताहेत बाहेरील देशांचं नागरिकत्व
2-डीजी औषध कसं करतं काम? का आहे रामबाण?कोरोनावर 2-deoxy-D-glucose औषध डीआरडीओने शोधलं आहे. 2 डीजी डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) च्या इंस्टिट्यूट ऑफ न्यूक्लियर मेडिसिन अँड अलाइड साइंसेज (INMAS) ने विकसित केले आहे. यामध्ये हैदराबादच्या डॉ. रेड्डीज लॅबोरेटरी (DRL) च्या संशोधकांचेही योगदान आहे. डॉ. रेड्डीज सामान्य लोकांसाठी हे औषध बनविणार आहे. हे औषध पावडरच्या रुपात असणार आहे.2 डीजी हे औषध 2डीजी अणूचे परिवर्तीत रुप आहे. जे ट्युमर, कॅन्सरच्या पेशींवर उपचारासाठी वापरले जाते. चाचणीमध्ये 2 डीजी कोरोना रुग्णांवर परिणामकारक असल्याचे समोर आले. तसेच हे औषध हॉस्पिटलाईज असलेल्या रुग्णांना ऑक्सिजनवरील अवलंबित्वदेखील कमी करते.कोरोनाच्या प्रत्येक व्हेरिअंटला रोखणार?INMAS चे संचालक डॉ. अनिल मिश्रा यांच्यानुसार 2 डीजी हे औषध आपलीच कॉपी बनविणाऱ्या व्हायरसला पकडते. व्हायरसचा कोणताही व्हेरिअंट असुदे त्याला भूक लागते. ही भूक शमविण्यासाठी तो पुढे येईल तेव्हा 2डीजी औषध त्याला जखडेल. व्हायरस वेगाने वाढू लागल्याने रुग्णाला ऑक्सिजनची गरज भासू लागते. मात्र, हे औषध व्हायरसला वाढण्यापासून रोखत असल्याने आपोआपच रुग्णाला ऑक्सिजनची गरज भासणार नाही.किती डोस घ्यायचा? (2 dg medicine dose)एका पाकिटात हा डोस मिळेल. कोरोना रुग्णाला ओआरएस जसे पाण्यात मिसळतात आणि पितात तसेच प्यावे लागणार आहे. हे औषध दिवसातून दोन वेळा घ्यावे लागणार आहे. कोरोना रुग्णांना पूर्णपणे बरे होण्यासाठी हे औषध 5-7 दिवस घ्यावे लागणार आहे, असे डॉ. सुधीर चंदना यांनी सांगितले.2DG: डोसची किंमत किती असेल? (2 dg medicine cost)किंमतीबाबत अद्याप काही जाहीर झालेले नाही. ते आज जाहीर होणार आहे. चंदना यांच्यानुसार किंमतीचा निर्णय डॉ. रेड्डीज कंपनी घेणार आहे. मात्र, हे औषध परवडणारे असेल यावर लक्ष दिले जाईल. सुत्रांनुसार एका पाकिटाची किंमत ही 500 ते 600 रुपयांदरम्यान असणार आहे.