शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वच्छता कर्मचारी गोळ्या कसा झाडेल? अक्षय शिंदे एन्काउंटरवर संजय राऊतांच्या फैरीवर फैरी
2
मालवणात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा दिमाखात उभा राहणार; सरकारचा मोठा निर्णय
3
'हे कुणाचं तरी षडयंत्र', सिद्धिविनायक प्रसादात उंदीर आढळल्याचे आरोप सदा सरवणकरांनी फेटाळले
4
MUDA जमीन घोटाळ्याप्रकरणी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या यांना मोठा धक्का, हायकोर्टाने दिले असे आदेश
5
रेशन कार्डावर किती दिवसांत नव्या सदस्याचं नाव अ‍ॅड होतं? वाचा तुमच्या कामाची संपूर्ण माहिती
6
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार; मदतीसाठी २३७ कोटी निधी वितरणाला मान्यता
7
मृत्यूच्या १० मिनिटे आधी अक्षय शिंदेसोबत काय घडलं?; पोलिसांनी जागीच केला एन्काउंटर
8
Navratri 2024: घरात सुख-समृद्धीसाठी घटस्थापनेआधी देव्हाऱ्यात करा 'हे' दहा मुख्य बदल!
9
संजय राऊतांनी शेअर केला अक्षय शिंदेचा व्हिडीओ; शिंदे-फडणवीसांना म्हणाले...
10
"रक्ताचे डाग होते, फ्रिज उघडताच..."; महालक्ष्मीच्या आईने सांगितला थरकाप उडवणारा प्रसंग
11
ना, सचिन, ना रोहित, ना विराट! अश्विन म्हणतो 'हा' खेळाडू भारतीय क्रिकेटचा कोहिनूर हिरा
12
अक्षय शिंदेवर गोळी झाडणारा पोलीस निरीक्षक कोण? का झालं होतं मुंबई पोलिसातून निलंबन?; जाणून घ्या... 
13
सासूच्या बहिणीला केलं यकृत दान, त्यानंतर घडलं असं काही..., अर्चनाच्या मृत्यूने सारेच हळहळले
14
मुंबईला 'अजिंक्य' ठेवण्यासाठी पुन्हा रहाणे; चॅम्पियन संघाचा कर्णधार, अय्यर-ठाकूरही मैदानात
15
अधिक व्याज देईल 'ही' स्कीम,  ₹१०,००,००० च्या गुंतवणूकीवर मिळतील ₹३०,००,०००; फक्त एक ट्रिक वापरा
16
अरबाजने सांगितलं छत्रपतींचा जयजयकार न करण्याचं कारण, म्हणाला "मी संभाजीनगरचा आणि..."
17
तुमच्या देवघरात ‘या’ देवता आहेत? ‘ही’ मूर्ती कधीही ठेवू नये! पण का? शास्त्र सांगते...
18
भाजपा एका आकड्यावर ठाम, 'फॉर्म्युला'ही जवळपास निश्चित! शिंदे-अजितदादांना किती जागा मिळणार?
19
शरद पवार, उद्धव ठाकरे ओबीसींसोबत नाहीत हे स्पष्ट झालं; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
20
खळबळजनक! विहिरीत सापडले पती-पत्नीचे मृतदेह; ३ महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न

Coronavirus: कोरोना काळात प्राणवायू टंचाईमुळे मृत्यू झालेला नाही, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांची सभागृहात माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2022 6:56 AM

Coronavirus: आतापर्यंत कोणत्याही राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात कोविड महामारी दरम्यान प्राणवायूच्या (ऑक्सिजन) टंचाईमुळे कोणाचा मृत्यू झाल्याला दुजोरा मिळालेला नाही, असे केंद्र सरकारने संसदेत सांगितले.

नवी दिल्ली : आतापर्यंत कोणत्याही राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात कोविड महामारी दरम्यान प्राणवायूच्या (ऑक्सिजन) टंचाईमुळे कोणाचा मृत्यू झाल्याला दुजोरा मिळालेला नाही, असे केंद्र सरकारने संसदेत सांगितले.

आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री भारती पवार यांनी शून्यकाळात पुरवणी प्रश्नांना उत्तर देताना म्हटले की, केंद्र सरकार कोविड-१९ बाबत राज्ये व केंद्रशासित प्रदेशांकडून नियमित पाठवल्या जाणाऱ्या अहवालाच्या आधारावर एकूण रुग्ण आणि विषाणूमुळे होणाऱ्या मृत्यूंची आकडेवारी ठेवते.डॉ. पवार म्हणाल्या की, केंद्र सरकारने राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना अपेक्षित विवरण पाठवण्यास सांगितले आहे आणि २० राज्ये व केंद्रशासित प्रदेशांनी दिलेल्या उत्तरांनुसार कोणतेही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाने प्राणवायूच्या टंचाईमुळे मृत्यू झाल्याला दुजोरा दिलेला नाही.

कोविडमुळे मरण पावलेल्यांच्या कुटुंबीयांना ५० हजार रुपयांची मदत केंद्र सरकारकडून दिली जाईल, अशी माहिती आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारत पवार यांनी राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. यासंदर्भात मूळ प्रश्न काँग्रेसचे नीरज डांगी यांनी विचारला होता. कोविडमुळे मरण पावलेल्यांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत दिली जाईल, अशी घोषणा केंद्र सरकारने केली होती. परंतु, काही तासातच ही घोषणा मागे घेण्यात आली. 

१२ वर्षांखालील मुलांचे लसीकरण१२ वर्षांखालील मुलांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्याचा निर्णय शास्त्रीय अभ्यास व तज्ज्ञ समितीने निर्णय घेतल्यानंतर घेतला जाईल, असेही डॉ. पवार यांनी काँग्रेसचे खासदार दिग्विजय सिंग यांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना दिली.

बुस्टरसाठी सक्ती नाही कोरोना प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रा घेतल्यानंतर बुस्टर मात्रा घेण्याची सक्ती नसल्याचे आरोग्य राज्यमंत्री डॉ. पवार यांनी स्पष्ट केले. या संदर्भात शिवसेनेचे अनिल देसाई यांनी पूरक प्रश्न विचारला होता.

कोरोनाचे ७९५ रुग्णदेशात मंगळवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत कोरोनाचे नवे ७९५ रुग्ण आढळले, तर ५८ जणांचा मृत्यू झाला. या ५८ मृत्यूत केरळमधील ५६ जणांचा समावेश आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत