नोएडा : नोएडातील सेक्टर १ मध्ये असलेल्या सीजफायर कंपनीला नोएडा जिल्हा प्रशासनाने पुढील आदेश येईपर्यंत सील ठोकले आहे. नोएडामधील कोरोनाच्या वाढत्या रुग्णांवर ताबा मिळविता येत नसल्याने उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जिल्हाधिकाऱ्याची कानउघडणी केली होती.
यावेळी या जिल्हाधिकाऱ्याने सुटीवर पाठविण्याची मागणी केली होती. या जिल्हाधिकाऱ्याला हटवून योगींनी तरुण जिल्हाधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. यानंतर आज एका कंपनीमध्ये आज प्रशासनाने कारवाई केली आहे. या कंपनीचा संचालकच कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. यामुळे त्या कंपनीतील कर्मचाऱ्यांनुळे २४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. एवढेच नाही तर या कंपनीत काम करणारे काही गाझियाबाद आणि फरिदाबादचे कर्मचारीही कोरोनाग्रस्त झाले आहेत. यामुळे उत्तर प्रदेश सरकारचे धाबे दाणाणले आहेत.
नोएडामध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमालीची वाढत आहे. सोमवारी दिवसभरात सहा रुग्ण सापडले आहेत. यामध्ये सीजफायर कंपनीचा संचालकही सहभागी आहे. तर २ आणि ५ वर्षांच्या दोन मुलांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. नोएडा जिल्ह्यामध्ये आतापर्यंत ३८ जणांना कोरोनाची लागण झाली असून हा राज्यातील सर्वाधिक आकडा आहे.
CoronaVirus: काळीज लागते! शेतकऱ्याने पिकवलेला १५ क्विंटल गहू मोफत वाटला
सीजफायर कंपनीच्या कर्मचाऱ्याच्या एकाच कुटुंबातील तिघांना कोरोनाची लागण झालेली आहे. याचबरोबर या कंपनीच काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याची ८२ वर्षीय आईलाही कोरोनाची बाधा झाली आहे. या एकट्या कंपनीमुळे नोएडामध्ये २४ जणांना कोरोना झाल आहे. तर एका गावातील दुकानदार तरुणालाही कोरोनाची लागण झाली आहे. कंपनीचा एक कर्मचारी काही दिवसांपूर्वी इंग्लंडहून परतला होता. त्याच्यामध्ये कोरोनाची लक्षणे नव्हती. मात्र, तपासणीवेळी त्याला कोरोना असल्याचे समोर आले होते.