नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून कोरोना व्हायरसबाबत अनेक दावे केले जात आहेत. हे दावे तज्ज्ञांनी केलेल्या अभ्यासावर अवलंबून आहेत. कोणी जून, कोणी जुलै, तर कोणी ऑगस्टमध्ये कोरोना उच्च पातळीवर असणार असल्याचे दावे करत आहे. आता आणखी एक महिना यामध्ये आला आहे. भारतात कोरोना व्हायरसचा मोठा उत्पात नोव्हेंबर मध्ये होणार असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
एका अभ्यासामध्ये हा दावा करण्यात आला आहे. या वेळी देशातील हॉस्पिटलमध्ये आयसीयू बेड आणि व्हेंटिलेटरची कमतरता जाणवणार असल्याचा इशारा या संशोधकांनी दिला आहे. लॉकडाऊनमुळे हा कालावधी पुढे गेला असून आठ आठवड्यांचा फरक पडला आहे. नोव्हेंबरच्या मध्यावर कोरोना देशात खूप मोठा उद्रेक करणार असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
हा दावा भारतीय आयुविज्ञान अनुसंशोधन परिषदेने गठन केलेल्या ऑपरेशन रिसर्च ग्रुपच्या संशोधकांनी केला आहे. यामध्ये लॉकडाऊनचे फायदे सांगण्यात आले आहेत. लॉकडाऊनमुळे कोरोनाचा उद्रेक 34 ते 76 दिवस पुढे गेला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. लॉकडाऊनने संभाव्य कोरोना रुग्णांची संख्या 69 ते 97 टक्क्यांनी कमी केली. या काळात आरोग्य सुविधा सुधारण्यास मदत मिळाली. मात्र, आता लॉकडाऊन उठविण्यात आला आहे. यामुळे नोव्हेंबरमध्ये म्हणजेच 5.4 महिन्यांसाठी आयसोलेशन बेड, 4.6 महिन्य़ांसाठी आयसीयू बेड आणि 3.9 महिन्यांसाठी व्हेंटिलेटरचा तुटवडा जाणवू लागणार आहे.
60 टक्के मृत्यू टळलेभारतात कोरोनाच्या विश्लेशनानुसार लॉकडाऊन काळातील तपासणी, उपचार आणि रुग्णांना वेगळे करण्यामुळे रुग्णसांख्या 70 टक्क्य़ांनी कमी होईल. तसेच लॉकडाऊन काळात 60 टक्के मृत्यू टळले आहेत.
हे पाऊल फायद्याचेसंशोधकांनी सांगितले की, कोरोनाबाबतच्या संशोधनामुळे त्यावर योग्य पाऊले उचलण्यास आणि आरोग्य यंत्रणा मजबूत करण्यास मदत मिळणार आहे. जेवढा कोरोना पसरायला उशिर होईल तेवढा जास्त वेळ तयारीला मिळेल. यामुळे कोरोनाची लस तयार करण्यासाठीही मोठी मदत मिळेल आणि भारताला गरजेच्या क्षणी ही लस उपलब्ध होईल.
अन्य महत्वाच्या बातम्या....
धक्कादायक! कोरोना पसरण्याच्या भितीने IRS शिवराज सिंहांची आत्महत्या
वाह प्रेमजी! दिलेल्या शब्दाला जागले; आयटी कंपनीला कोरोना हॉस्पिटल बनवले
अधुरी प्रेम कहानी! GF ला भेटण्यासाठी मध्यरात्री गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसला डॉक्टर; जिवाला मुकला
दक्षिण कोरियात खळबळ! लष्करी कारवाई करा; किम जोंग उनच्या बहिणीचे सैन्याला 'आदेश'