शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
3
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, उगाच नाक खुपसू नये”; संजय राऊतांची टीका
4
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
5
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
6
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
7
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
8
Maharashtra Election 2024 Live Updates: निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्रकाश आंबेडकर यांच्या बॅगची तपासणी
9
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
10
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
11
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
12
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
13
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
14
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
15
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
16
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
17
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
18
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
19
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
20
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा

CoronaVirus News: सामान्यांना दिलासा देण्यासाठी आयकरात सूट देणार का?; अर्थमंत्री म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 9:26 PM

CoronaVirus News: कररचना, आयकर भरणा, रोजगार, पगार कपातीसह विविध मुद्द्यांवर अर्थमंत्र्यांचं भाष्य

नवी दिल्ली: गेल्या आठवड्यात सलग पाच दिवस पत्रकार परिषद घेऊन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या 'आत्मनिर्भर भारत पॅकेज'मधील तरतुदी जाहीर केल्या. विविध क्षेत्रांसाठी, विविध घटकांसाठी सीतारामन यांनी काही महत्त्वाच्या घटना घडल्या. आत्मनिर्भर भारत पॅकेजमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यानंतर मात्र केंद्र सरकार कोणत्याही मोठ्या घोषणा करणार नसल्याचं अर्थमंत्र्यांनी एका मुलाखतीत सांगितलं. केंद्राकडून आयकरात सवलत दिली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. मात्र सरकार करामध्ये सूट देण्याबद्दलचा कोणताही विचार करत नसल्याचं सीतारामन यांनी स्पष्टपणे सांगितलं. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष करांमध्ये कोणताही बदल करण्याचा, सूट देण्याचा विचार नसल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी दिली. त्या 'न्यूज१८' सोबत बोलत होत्या. कोरोना संकटामुळे सरकारला मिळणाऱ्या महसुलावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे कर वसुलीत दिलासा देण्याचा विचार करू शकत नाही, असं सीतारामन यांनी सांगितलं. लॉकडाऊनमुळे उद्योगधंदे ठप्प झाले असून त्यामुळे अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता आहे. याबद्दलची माहिती स्थानिक कामगार विभागांनी घ्यावी, असं अर्थमंत्री म्हणाल्या. कर्मचाऱ्यांचे पगार कापू नका, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं होतं. मात्र तरीही कर्मचाऱ्यांचे पगार कापले जात असल्याकडे लक्ष वेधताच याबद्दल राज्यांनी खासगी क्षेत्राशी चर्चा करावी, असं उत्तर सीतारामन यांनी दिलं. अर्थव्यवस्थेचा गाडा ठप्प झाल्यानं गरिबांच्या हाती पैसा जायला हवा. मात्र केंद्र सरकारच्या पॅकेजमुळे गरिबांच्या हातात पैसा गेलेला नाही. त्यावरुन निर्मला सीतारामन यांच्यावर टीका होत आहे. यावर गरिबांच्या, विशेषत: मजुरांच्या हाती पैसे देणं हा एकमेव मार्ग नाही. सरकार कामगार कायद्यात बदल करण्याच्या विचारात आहे. मात्र याविषयी संसदेत चर्चा होण्याची आवश्यकता असल्याचं सीतारामन म्हणाल्या.CoronaVirus News: राज्यपालांनी बोलावलेल्या बैठकीला मुख्यमंत्री जाणार नाहीत

ऑस्ट्रेलिया म्हणजे अमेरिकेचा कुत्रा; चीनची जीभ घसरली, तणाव वाढणारपश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर 'अम्फान'ची धडक; अनेक घरं जमीनदोस्त'तो' भाग आमचाच! नेपाळकडून नवा नकाशा प्रसिद्ध; भारताच्या ३९५ चौरस किलोमीटर प्रदेशावर दावा

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNirmala Sitaramanनिर्मला सीतारामन