नवी दिल्ली : देशात सोमवारी कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत आणखी घसरण होऊन ती ३ लाखांपेक्षा कमी झाली आहे. २४ तासांमध्ये आढळणाऱ्या रुग्णांच्या संख्येचा हा गेल्या २७ दिवसांतील नीचांक आहे. देशात सोमवारी कोरोनाचे २ लाख ८१ हजार ३८६ रुग्ण आढळून आले, तसेच ३ लाख ७८ हजार ७४१ जण बरे झाले आहेत.
गेल्या २४ तासांत ४,१०६ जणांचा बळी गेला असून मृतांची संख्या कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. रविवारी कोरोना बळींची संख्या ४,०७७ होती. येत्या काळात कोरोनाच्या येणाऱ्या आणखी लाटांमुळे देशापुढील अडचणी वाढत जातील. पुढील ६ ते १८ महिने भारताला अधिक काळजीपूर्वक पावले टाकावी लागतील, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.
महाराष्ट्रात बाधितांची संख्या -५४,०५,०६८ बरे झालेले - ४८,७४,५८२कोरोनाबळी - ४२,४८६सक्रिय रुग्ण - ४,४५,४९५
देशात बाधितांची संख्या - २४९६५४६३ बरे झालेले - २,११,७४,०७६कोरोनाबळी - २,७४,३९०सक्रिय रुग्ण - ३५,१६,९९७
जगात बाधितांची संख्या - १६.३७कोटी बरे झालेले - १४.२२कोटीकोरोनाबळी - ३३.९३लाखसक्रिय रुग्ण - १.६९कोटी
अमेरिकेतील बळींची संख्या ६ लाखांवरअमेरिकेमध्ये ३ कोटी ३७ लाख कोरोना रुग्ण असून त्यातील २ कोटी ७१ लाख रुग्ण बरे झाले. त्या देशातील बळींची संख्या ६ लाखांवर गेली असून ५९ लाख कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.