शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाने जे ठाकरेंसोबत केले, तसेच आता शिंदेंशी वागतायत का? शिंदे गटाचे नेते म्हणाले...
2
एकनाथ शिंदे यांची दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद, मोठा निर्णय जाहीर करणार? 
3
मुख्यमंत्री कोण होणार? लवकरच उत्तर मिळेल; देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य
4
काय आहे 'वन नेशन, वन सबस्क्रिप्शन' योजना, कोणाला होणार फायदा?
5
IPL Auction 2025: धडामsss ! मॅक्सवेल ते स्टार्क… ‘या’ ५ बड्या खेळाडूंचा भाव ‘धाडकन्’ कोसळला..!!
6
Enviro Infra Engineers IPO Allotment : एन्व्हायरो इन्फ्रा IPO चं अलॉटमेंट झालीये का? कसं चेक कराल, जाणून घ्या 
7
६ बहिणींचं लग्न, ४ भावांचं शिक्षण; अपघातात मृत्यू झालेल्या डॉक्टरची डोळे पाणावणारी गोष्ट
8
'सर्वात मोठा पक्ष कोणताही असेल, मुख्यमंत्री तुम्हीच होणार'; निवडणुकीपूर्वी भाजपाने शिंदे शिवसेनेला शब्द दिलेला?
9
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
10
"...म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी रस्ता मोकळा करावा"
11
"राज ठाकरे यांना फसवलं, इव्हीएममुळेच महायुती जिंकली’’, मनसेचा गंभीर आरोप
12
'पुष्पा 2'नंतर 'पुष्पा 3' येणार की नाही? अल्लू अर्जुनच्या पोस्टमधून चाहत्यांना मिळालं उत्तर
13
Jacqueline Fernandez : "तिला काहीच..."; सुकेशकडून महागड्या भेटवस्तू घेणाऱ्या जॅकलिन फर्नांडिसच्या वकिलांचा युक्तिवाद
14
IRCTC ची ब्लॅक फ्रायडे ऑफर, स्वस्तात मिळेल फ्लाइट तिकीट आणि 'ही' सुविधा...
15
गुरु प्रदोष: ८ राशींना अचानक धनलाभ योग, शुभ घडेल; इच्छापूर्ती, दत्तगुरु-महादेवांची कृपा!
16
"बाप आखिर बाप होता है", मुलगी पराभूत झाल्यानंतर विजयी पित्याचे बॅनर चर्चेत!
17
 स्वबळावर बहुमताजवळ, तरीही मुख्यमंत्रिपदावर अडलंय घोडं, भाजपासमोर आहेत या अडचणी
18
जगातील टॉप ५० हायराईज टॉवरपैकी एकात आहे Rohit Sharmaचं घर; किंमत, वैशिट्ये पाहून अवाक् व्हाल
19
ऐश्वर्या रायबाबत भावजयचीही क्रिप्टिक कमेंट, अभिनेत्रीसोबत कधीच फोटो शेअर करत नाही; कारण...
20
Maharashtra Politics: महाराष्ट्रात बिहार मॉडेल लागू होणार नाही; भाजपच्या नेत्याने आतली बातमी सांगितली; मुख्यमंत्रिपदावर सस्पेन्स कायम

CoronaVirus: चिंताजनक! देशात बाधितांची संख्या ४ लाख ७३ हजारांवर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2020 4:10 AM

आतापर्यंत महाराष्ट्रात १ लाख ४२ हजार ९00 रुग्ण आढळले असून, दिल्लीत ही संख्या ७0 हजार ३९0, तमिळनाडूमध्ये ६७ हजार ४६८ तर गुजरातमध्ये २८ हजार ९४३ आहे.

नवी दिल्ली : भारतातील कोरोना रुग्णांची संख्या गुरुवारी सकाळी ४ लाख ७३ हजारांवर गेली असून, सध्याचा रुग्णवाढीचा वेग पाहता, शनिवारी हा आकडा ५ लाखांपर्यंत गेलेला असेल, असे दिसत आहे. गेल्या २४ तासांत देशात १५ हजार ९८६ म्हणजे सुमारे १६ हजार रुग्णांची भर पडली आहे.देशात २0 जूनपासून रोज १४ हजारांहून अधिक रुग्ण आढळल्याने अवघ्या ६ दिवसांतच रुग्णांचा आकडा ९0 हजारांनी वाढला आहे. गेल्या २४ तासांत आढळलेले रुग्ण आतापर्यंत सर्वाधिक आहेत. आतापर्यंत महाराष्ट्रात १ लाख ४२ हजार ९00 रुग्ण आढळले असून, दिल्लीत ही संख्या ७0 हजार ३९0, तमिळनाडूमध्ये ६७ हजार ४६८ तर गुजरातमध्ये २८ हजार ९४३ आहे.मात्र शहरांचा विचार करता मुंबईच्या तुलनेत दिल्लीत अधिक रुग्ण आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार : २४ तासांत ४१८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंतची मृतांची संख्या १४ हजार ८९४ झाली आहे. त्यापैकी ७0 टक्के रुग्णांना अन्य व्याधी होत्या. महाराष्ट्रात आतापर्यंत ६७३९ मृत्यू झाले आहेत. अरुणाचल प्रदेशात २४ तासांत एक जण मरण पावला. त्या राज्यातील कोरोनाचा तो पहिला बळी आहे. ज्या राज्यांत कोरोनाच्या रुग्णांची संख्या १0 हजारांहून अधिक आहे, त्यात हरियाणा, तेलंगणा, आंध्र प्रदेश व कर्नाटक यांचा समावेश आहे, तर उत्तरप्रदेश, राजस्थान, प.बंगाल, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये रुग्णांची संख्या १५ हजारांहून अधिक आहे.>बरे होण्याचे प्रमाण वाढलेदेशात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून आता ५७.४३% झाले आहे. आतापर्यंत २ लाख ७६ हजार ६९६ रुग्ण बरे झाले असून, सध्या १ लाख ८६ हजार ५१४ रुग्णांवर रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. कोरोनाच्या चाचण्यांमध्ये वेगाने वाढ होत असून, आतापर्यंत देशात ७५ लाख ५0 हजार ७८२ नमुने तपासण्यात आले. बुधवारी एका दिवसात २ लाख ७ हजार ८७१ चाचण्या घेण्यात आल्या.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या