नवी दिल्ली - कोरोना व्हायरसच्या सामना करण्यासाठी देश सज्ज झालेला असतानाच देशातील रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 700 हून अधिक झाली आहे. संसर्ग रोखण्यासाठी सर्वतोपरी योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. भारतातील अनेकांची चाचणी निगेटिव्ह आली असून काहींना उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोनाशी लढण्यासाठी देशात सर्वात मोठं रुग्णालय उभारण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. ओडिशा सरकार देशातील सर्वात मोठं ‘COVID-19 ट्रिटमेंट’ रुग्णालय उभारणार आहे.
कोरोनाची लागण झालेल्यांसाठी सर्वात मोठं रुग्णालय उभारणारं ओडिशा हे देशातील पहिलं राज्य ठरणार आहे. कोरोनाग्रस्तांसाठी हे रुग्णालयात उभारण्यात येत असून यामध्ये तब्बल एक हजार बेडची व्यवस्था असणार आहे. ओडिशा सरकार, कार्पोरेट्स व वैद्यकीय महाविद्यालयांच्या समन्वयातून ‘COVID-19 ट्रिटमेंट’ रुग्णालय उभारले जात आहे. गुरुवारी (26 मार्च) एका त्रिपक्षीय सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी याबाबत आदेश दिले आहे. सरकार या रुग्णालयाच्या निर्मितीसाठी तयारीला लागले आहे.
कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी निमलष्करी दलाची देशभरातील 32 रुग्णालये सरकारने ताब्यात घेतली आहेत. त्यामध्ये 1900 खाटा आहेत. केंद्र सरकारच्या उच्चस्तरीय बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. केंद्रीय राखीव पोलीस दल, सीमा सुरक्षा दल, इंडो-तिबेटियन सीमा पोलीस व सशस्त्र सीमा बलची ही रुग्णालये ग्रेटर नोएडा, हैदराबाद, गुवाहाटी, जम्मू-तेकानपूर (ग्वाल्हेर), दिमापूर, इम्फाळ, नागपूर, सिल्चर, भोपाळ, आवाडी, जोधपूर, कोलकाता, पुणे व बंगळुरू येथील ही रुग्णालये आहेत.
लष्कर व केंद्रीय निमलष्करी दलाने कोरोनाग्रस्तांसाठी 2000 पेक्षा जास्त बेडची व्यवस्था केली आहे, तसेच हिमाचल प्रदेशात हमीरपूर जिल्हा प्रशासनाने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या वसतिगृहातील 2000 खोल्या रुग्णांसाठी घेतल्या आहेत. सीमा सुरक्षा करणाऱ्या आयटीबीपीमध्ये तर देशातील सर्वांत मोठे क्वारंटाईन सेंटर चालवले जात आहे. तेथे 1000 जणांची व्यवस्था केली आहे. दरम्यान, केंद्र सरकारने कोरोना व्हायरससंदर्भात नागरिकांना माहिती देण्यासाठी एक व्हॉटस्अॅप क्रमांक जारी केला आहे. 9013151515 असा तो नंबर असून, त्यावरील सेवा 24 तास सुरू असेल, असे सांगण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus: कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी राजकीय नेते सरसावले; पाहा कोणत्या नेत्याने किती मदत केली?
CoronaVirus : ...फक्त लॉकडाऊन करून चालणार नाही; रघुराम राजन यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
Coronavirus: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज फेसबुकद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधणार
CoronaVirus : कोरोनाचे जगभरात २२ हजारांवर बळी; इटली, स्पेन, चीनमध्ये सर्वाधिक मृत्यू