नवी दिल्ली : भारतात सध्या कोविड-१९ वरील लसींच्या चाचण्या घेतल्या जात असून त्यांच्या दोन किंवा तीन मात्रा (डोसेस) दिल्या जातील, अशी महत्त्वाची घोषणा केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी रविवारी येथे केली.
लसीचा एक डोस की दोन याबद्दल आपले मत व्यक्त करताना हर्षवर्धन म्हणाले की, कोरोनाची साथ लवकर नियंत्रणात आणायची असेल, तर लसीचा एक डोस देणे योग्य ठरेल. सिरम इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया आणि भारत बायोटेक यांच्याकडून विकसित केली जात असलेल्या लसीचे दोन डोस तर झायडस कॅडिला हेल्थकेअर लसीचे तीन डोस आवश्यक आहेत. डॉ. हर्षवर्धन म्हणाले की, भारत लसीचे ४०० ते ५०० दशलक्ष डोसेस जुलै २०२१ पर्यंत मिळवण्याच्या अवस्थेला असेल. अनेक लसी असल्या तरी त्या सुरक्षित असतील व त्यातून प्रतिकारक्षमता निर्माण होईल.