Coronavirus : दोन महिन्यांमध्ये मध्य प्रदेशात झाले एक लाख मृत्यू, माजी मुख्यमंत्र्यांचा गंभीर आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2021 06:38 PM2021-05-21T18:38:20+5:302021-05-21T18:38:32+5:30

Coronavirus In Madhya Pradesh: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान मार्च-एप्रिल या दोन महिन्यांमध्ये मध्य प्रदेशमध्ये १ लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ (Kamalnath) यांनी केला आहे.

Coronavirus: One lakh deaths in Madhya Pradesh in two months, serious allegations by former chief minister Kamal Nath | Coronavirus : दोन महिन्यांमध्ये मध्य प्रदेशात झाले एक लाख मृत्यू, माजी मुख्यमंत्र्यांचा गंभीर आरोप 

Coronavirus : दोन महिन्यांमध्ये मध्य प्रदेशात झाले एक लाख मृत्यू, माजी मुख्यमंत्र्यांचा गंभीर आरोप 

Next

भोपाळ - कोरोना विषाणूच्या संसर्गाची दुसरी लाट आता देशातील विविध राज्यांमधून ओसरू लागली आहे. (Coronavirus In Madhya Pradesh) मात्र आता कोरोनावरून राजकारणाला जोर आला असून, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान मार्च-एप्रिल या दोन महिन्यांमध्ये मध्य प्रदेशमध्ये १ लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ (Kamalnath) यांनी केला आहे. दरम्यान, कमलनाथ यांच्या या आरोपानंतर मध्य प्रदेशमधील राजकारण तापले आहे. . ( One lakh deaths in Madhya Pradesh in two months, serious allegations by former chief minister Kamal Nath)

राज्यात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींना प्रत्येकी एक लाख रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केली आहे. त्यानंतर कमलनाथ यांनी राज्यातील कोरोनामुळे झालेल्या मृतांचा आकडा लपवण्यात येत असल्याचा तसेच राज्यात एक लाखाहून अधिक व्यक्तींचा मृत्यू झाल्याचा आरोप केला. 

कमलनाथ म्हणाले की, सरकारकडून सांगण्यात येत असलेले आकडे खोटे आहेत. हे आकडे केवळ राज्यालाच नाही तर जगाला फसवण्यासाठी सांगण्यात येत आहे. जेवढे मृतदेह स्मशानात आणि कब्रस्थानात आले त्यामध्ये ८० टक्के मृत्यू हे कोरोनामुळे झालेले मृत्य आहेत असे मानले पाहिजे. नगरपालिका आणि महानगरपालिका हे कोरोनामुळे झालेले मृत्यू नाहीत, असे म्हणताहेत. मात्र ते कुणाला मुर्ख बनवत आहेत.

सरकारी आकडेवारीनुसार ३० मार्च ते २० मे दरम्यान मध्य प्रदेशमध्ये १६७६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मात्र कमलनाथ यांचा आरोप आहे की, मार्च ते एप्रिल या काळात स्मशान आणि कब्रस्थानामध्ये आलेल्या एकूण १ लाख २७ हजार ५३० मृतदेहांपैकी १ लाख २ हजार २ मृतदेहांवर कोविड प्रोटोकॉलअंतर्गत अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. 

दरम्यान, कमलनाथ यांना राज्य सरकारने प्रत्युत्तर दिले असून, जर राज्यामध्ये १ लाखांहून अधिक मृत्यू हे कोरोनामुळे झाल्याचा पुरावा कमलनाथ यांनी दिला तर मी त्वरित राजीनामा देईन, असे प्रतिआव्हान मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी दिले आहे. दरम्यान, कमलनाथ यांना मृतदेह मोजण्याची सवय आहे, १९८४ ची दंगल सर्वांना माहिती आहे, असा टोलाही मिश्रा यांनी लगावला.  

Web Title: Coronavirus: One lakh deaths in Madhya Pradesh in two months, serious allegations by former chief minister Kamal Nath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.