नवी दिल्ली - जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. वेगाने पसरणाऱ्या आणि भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनामुळे आतापर्यंत 1,26,720 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 1,999,279 लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. तर दुसरीकडे भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ही वेगाने वाढत आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या 11,000 हून अधिक झाली असून आतापर्यंत 350 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागत आहे. याच दरम्यान एक दिलासादायक माहिती समोर आली आहे.
देशात आणि जगात कोरोना रुग्णांची संख्या आणि मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असताना कोरोनासंदर्भात दिलासादायक माहिती मिळत आहे. देशात 1000 तर जगात 4,78,932 जणांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वच देशांमध्ये खबरदारीचे उपाय केले जात आहेत. कोरोनाग्रस्तांवर रुग्णालयात योग्य उपचार केले जात असून अनेकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. भारतात आतापर्यंत 1000 हून अधिक जणांनी कोरोनाला हरवलं असून त्यांना उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर जगात 4,78,932 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
भारतात एका दिवसात 141 हून अधिक कोरोनाचे रुग्ण बरे झाले आहेत. देशभरातील 15 राज्यातील 25 जिल्ह्यांमध्ये गेल्या 14 दिवसांत एकही कोरोनाचा रुग्ण आढळला नाही. तसेच कोरोनाविरोधात भारत लढत आहे. कोरोनामुळे होणारे नुकसान मोठ्या प्रमाणात टाळण्यात भारताला यश आले आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. भारतात सध्याची स्थिती पाहता 3 मेपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.
अमेरिका, चीन, इटली आणि स्पेनसारख्या देशात कोरोना व्हायरसने कहर केला आहे. या देशांमधील मृतांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत चालला आहे. महासत्ता असलेल्या अमेरिकेतही मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे. अमेरिकेत कोरोनामुळे सर्वाधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. अमेरिकेत 26,047 लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. तर तब्बल 613,886 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. याच दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी WHO चा निधी रोखण्याचे संकेतही दिले होते. त्यानंतर ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेचा निधी रोखण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : लय भारी! 'या' देशात ATMमधून पैसे नाही तर तांदूळ काढता येणार
Coronavirus : अमेरिकेने WHO वर केला गंभीर आरोप, घेतला मोठा निर्णय
CoronaVirus अमेरिकेमध्ये औषध कंपनीनेच पसरवला कोरोना? बायोजनवर गंभीर आरोप
राज्यात अडीच हजारांहून अधिक रुग्ण, १८ मृत्यूंची नोंद, एकूण १८४ वर