शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

CoronaVirus: जगभरात कोरोना लाट पुन्हा तीव्र; एकाच आठवड्यात वाढले 12% रुग्ण, भारतातील 13 राज्यांनी टेन्शन वाढवलं 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2021 11:56 AM

भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर झालेल्या एका सिरो सर्व्हेनुसार अद्यापही जवळपास 40 कोटी लोकांना कोरोनाचा धोका...

वॉशिंग्टन/नवी दिल्ली - भारतासह संपूर्ण जगातील कोरोना रुग्ण संख्या गेल्या काही दिवसांत पुन्हा वाढली आहे. भारतात रोज आढळणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या 40 हजारच्या जवळपास आहे. तर, जगात गेल्या आठवड्यात कोरोनाचे 34 लाख नवे रुग्ण समोर आले. जागतिक आरोग्य संखटनेने म्हटले आहे, की गेल्या आठवड्यात 3.4 मिलियनहून अधिक कोरोना रुग्ण समोर आले आहेत. ही संख्या या पूर्वीच्या आठवड्याच्या तुलनेत 12 टक्क्यांनी अधिक आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आरोग्य यंत्रनांच्या म्हणण्यानुसार, मृतांची संख्या सातत्याने कमी होत आहे. गेल्या आठवड्यात जगभरात 57,000 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता.

कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू वेस्टर्न पॅसिफिक आणि  युरोपीयन देशांत झाले आहेत. गेल्या आठवड्यात डब्ल्यूएचओने म्हटले होते, की कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण इंडोनेशिया, इंग्लंड, ब्राझील, भारत आणि अमेरिकेत होते.

भारतासंदर्भात बोलायचे झाल्यास, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर झालेल्या एका सिरो सर्व्हेनुसार (देशव्यापी सर्वेक्षण) जवळपास 40 कोटी लोकांना कोरोनाचा धोका आहे. या सर्वेत असेही सांगण्यात आले आहे, की 6 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या देशातील नागरिकांपैकी दोन तृतियांश लोकांत सार्स-सीओव्ही-2 अँटीबॉडी आढळून आली आहे. रिपोर्टनुसार देशातील एक तृतियांश लोकांत ही अँटीबॉडी नाही. याचाच अर्थ जवळपास  40 कोटी लोकांना अजूनही कोरोना व्हायरस संक्रमणाचा धोका आहे.

CoronaVirus: लसीचे संरक्षण कवच भेदून कमजोर पडतोय डेल्टा व्हेरिएंट, पण...

या रांज्यांनी टेन्शन वाढवलं -महाराष्ट्र, केरळ, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि इशान्येकडील अनेक राज्यांत मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्ण समोर येत आहेत. केरल, आंध्र प्रदेश, दिल्ली, उत्तराखंड या राज्यांत रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. चिंतेचा विषय म्हणजे, महिन्याच्या सुरुवातीला यांपैकी काही राज्यांत संक्रमण दर अत्यंत कमी झाला होता. मात्र, आता हळू-हळू रुग्ण संख्या पुन्हा वाढताना दिसत आहेत.

गेल्या 24 तासांत या राज्यांत आढळले ससर्वाधिक रुग्ण - -  केरळ - 17,481-  महाराष्ट्र - 8,159 -  आंध्र प्रदेश - 2,527-  ओडिशा - 1,927-  तामिळनाडू - 1,891

भारतात आतापर्यंत 4,18,987 मृत्यू -आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतात गेल्या 24 तासांत 41,383 नवे रुग्ण समोर आले आहेत. तर, 507 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 38,652 रुग्ण बरे झाले आहेत.

- एकूण रुग्ण - 3,12,57,720- बरे झालेले एकूण रुग्ण - 3,04,29,339-  सक्रिय रुग्ण - 4,09,394-  एकूण मृत्यू - 4,18,987   -  लसीकरणाचा आकडा - 41,78,51,151

Coronavirus: दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रात ऑक्सिजनअभावी एकही मृत्यू नाही?, आरोग्यमंत्र्यांनी दिलं असं उत्तर

दुसरीकडे, अमेरिकेच्या सेंटर फॉर ग्लोबल डेव्हलपमेन्टच्या एका अहवालात दावा करण्यात आला आहे, की भारतात कोरोना व्हायरस संक्रमणामुळे झालेल्या मृत्यूंचा आकडा 34 लाख ते 49 लाख एवढा असू शकतो. यासंस्थेने जानेवारी 2020 ते जून 2021 पर्यंतचा डाटा जमा केला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसAmericaअमेरिकाIndiaभारत