CoronaVirus : टेन्शन वाढलं...! लसीचे दोन्ही डोस घेऊनही केरळमध्ये 40 हजार जणांना कोरोनाची लागण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 07:28 PM2021-08-11T19:28:26+5:302021-08-11T19:30:05+5:30

केरळमधील वाढती कोरोना रुग्ण संख्या लक्षात घेत, केंद्र सरकारने केरळ सरकारकडून अशा सर्व संक्रमित रुग्णांची जीनोम सिक्वेंसिंग मागवली आहे. (Corona cases in kerala )

CoronaVirus Over 40000 Corona cases found who have been vaccinated in kerala  | CoronaVirus : टेन्शन वाढलं...! लसीचे दोन्ही डोस घेऊनही केरळमध्ये 40 हजार जणांना कोरोनाची लागण

CoronaVirus : टेन्शन वाढलं...! लसीचे दोन्ही डोस घेऊनही केरळमध्ये 40 हजार जणांना कोरोनाची लागण

googlenewsNext

केरळमध्ये वाढत्या कोरोना रुग्ण संख्येने सरकारचे टेन्शन वाढवले आहे. अशातच, ज्या लोकांनी कोरोना लस घेतली आहे, अशांनाही कोरोनाची लागण होत असल्याचे समोर आले आहे. एनडीटीव्हीच्या एक रिपोर्टनुसार, केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे, की केरळमध्ये जवळपास 40 हजार कोरोना रुग्ण असे आहेत, ज्यांना संपूर्ण लसीकरण झाले असतानाही कोरोनाची लागण झाली. (CoronaVirus Over 40000 Corona cases found who have been vaccinated in kerala)

केरळमधील वाढती कोरोना रुग्ण संख्या लक्षात घेत, केंद्र सरकारने केरळ सरकारकडून अशा सर्व संक्रमित रुग्णांची जीनोम सिक्वेंसिंग मागवली आहे. हे सॅम्पल कोरोनाच्या दुसऱ्या रुग्णांशी जुळवले जातील. लस घेतलेली असतानाही येथे लोक कोरोना संक्रमित होत आहे, हे सरकारने अत्यंत गांभीर्याने घेतले आहे. मात्र, हा डेल्टा व्हेरिएंटचा परिणाम आहे का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. असे अधिकांश रुग्ण येथील पथानामथिट्टा जिल्ह्यात आढळले आहेत. 

Corona Vaccine : DGCIचा मोठा निर्णय...! कोव्हॅक्सीन-कोविशील्डच्या मिक्स डोससंदर्भात अभ्यासाची दिली परवानगी

केरळमध्ये सर्वाधिक नवे रुग्ण -
केरळमध्ये मंगळवारी 21,119 नवे कोरोना रुग्ण समोर आले. आता राज्यातील एकूण संक्रमितांचा आकडा 35,86,693 वर पोहोचला आहे. राज्यातील संक्रमणदर 16 टक्क्यांच्या जवळ पोहोचला आहे. येथे गेल्या एक दिवसात कोरोनामुळे 152 लोकांचा मृत्यू झाला असून राज्यातील मृतांची संख्या आता 18004 एवढी झाली आहे. सोमवारपासून आतापर्यंत 18493 रुग्ण संक्रमणमुक्त झाले आहेत. याच बरोबर राज्यातील कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या आता 33,96,184 झाली आहे.

CoronaVirus : कोव्हॅक्सीन घेतलेल्यांची विचित्र कोंडी, टेन्शन वाढलं...! ठोठावला न्यायालयाचा दरवाजा

देशातील कोरोना रुग्णांसंदर्भातील महत्वाची माहिती -
ऐकूण रुग्ण - तीन कोटी 20 लाख 36 हजार, 511.
एकूण डिस्चार्ज - तीन कोटी 12 लाख 20 हजार 981.
एकूण अॅक्टिव्ह केसेस - तीन लाख 86 हजार 351.
एकूण मौत - चार लाख 29 हजार 179.
एकूण लसीकरण - 51 कोटी 90 लाख डोस देण्यात आले.

Web Title: CoronaVirus Over 40000 Corona cases found who have been vaccinated in kerala 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.