श्रीनगर - उत्तर काश्मीरच्या कुपवाडा सेक्टरमध्ये दौरा करण्यासाठी गेलेले भारतीय लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांनी पाकिस्तानच्या नापाक हरकतींना सडेतोड उत्तर दिलं. संपूर्ण जगावर सध्या कोरोनाचं संकट उभं राहिलं आहे. जगातील २० लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे तर १ लाख ३० हजारांहून जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.
अशा संकट परिस्थितीत पाकिस्तानकडून होणाऱ्या घुसखोरीवर लष्करप्रमुखांनी भाष्य केलं. ते म्हणाले की, कोरोनाच्या संघर्ष काळात भारत स्वत:च्या देशासोबतच इतर दुसऱ्या देशांनाही मदत करत आहे. त्यावेळी पाकिस्तानात दहशतवादी षडयंत्र रचत आहे. जगातील कोरोना युद्धात भारत देशातील लोकांसोबतच इतर देशातील नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी मदत करत आहे. जगात औषधांचा तुटवडा होत असताना कोरोनाशी लढा देण्यासाठी भारताने सर्व देशांना साथ दिली आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानात दहशतवादी काश्मीरमध्ये अशांतता पसरवण्यासाठी प्रयत्न करत आहे असा आरोप त्यांनी केला.
पाकिस्तानी दहशतवादी घुसखोरी करण्याचा प्रयत्न
कुपवाडा जिल्ह्यातील सर्व भागात पाकिस्तानने गेल्या काही दिवसांत अनेकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. जगभरात कोरोनाच्या कहर असताना पाकिस्तानने मागील काही दिवसात कुपवाड्यातील केरन येथे दहशतवाद्यांच्या मोठ्या तुकड्यांची घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यात सहभागी असलेल्या पाच दहशतवाद्यांना भारतीय सैन्याने ठार केले होते.
सीमेजवळ गोळीबार
घुसखोरीच्या प्रयत्नांव्यतिरिक्त, पाकिस्तानी सैन्य गेल्या अनेक दिवसांपासून जम्मू-काश्मीरच्या नियंत्रण रेषेनजीक जोरदार गोळीबार करून सीमाभाग अशांत करण्यात व्यस्त आहे. उत्तर काश्मीरसह राजौरी, पुंछ आणि कठुआ भागात पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारामुळे अनेक स्थानिक नागरिकही मरण पावले आहेत.
CoronaVirus नोकरीवरून काढून टाकाल तर याद राखा! पंतप्रधान नरेंद्र मोदींची नजर आहे