कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं देशात हाहाकार माजवला होता. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत अनेक जणांना कोरोनाची बाधा झाली. तर तुलनेनं अधिक लोकांचा मृत्यूही झाला. दरम्यान, केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांनी राज्यांकडून मिळालेल्या अहवालाचा हवाला देत ५७७ बालकांच्या डोक्यावरून या महासाथीमुळे आई-वडिलांचं छत्र हरपल्याची माहिती दिली. तसंच कोरोनामुळे आपल्या आई-वडिलांना गमावणाऱ्या बालकांच्या संरक्षणासाठी आणि सहकार्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचंही त्या म्हणाल्या."कोरोनाच्या महासाथीत आपल्या पालकांना गमावलेल्या त्या प्रत्येक बालकाचं संरक्षण करण्यासाठी भारत सरकार कटिबद्ध आहे. राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांकडून माहिती देण्यात आली आहे. १ एप्रिलपासून ५७७ बालकांच्या आई-वडिलांचं करोनामुळे निधन झालं," अशी माहिती स्मृती इराणी यांनी दिली. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून यासंदर्भातील माहिती दिली.
Coronavirus Pandemic: कोविडमुळे आई गमावली अन् बाबाही; 'त्या' ५७७ मुला-मुलींना देणार मायेचं छत्र; केंद्राची ग्वाही
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 1:22 PM
केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी दिली माहिती. प्रत्येक बालकाच्या संरक्षणासाठी आणि सहकार्यासाठी कटिबद्ध असल्याची इराणी यांनी माहिती.
ठळक मुद्देकेंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी दिली माहिती.प्रत्येक बालकाच्या संरक्षणासाठी आणि सहकार्यासाठी कटिबद्ध असल्याची इराणी यांनी माहिती.