कर्नाटक सरकार राज्यभरात आरोग्य सेवा व्यवस्थित, पुरेश्या असल्याचा दावा करीत आहे. बेड्सची कमतरता नसल्याचाही दावा केला जात आहे, परंतु वास्तव काही वेगळेच आहे. बंगळुरूमध्ये एका कोरोना रूग्णाचे कुटुंबिय त्याला दाखल करण्यासाठी एका रुग्णालयातून दुसर्या रुग्णालयामध्ये भटकत होते. काहीही केल्या त्यांना बेड मिळत नवह्ता. 10 हून अधिक रुग्णालयांनी त्याला परत पाठवले. निराश होऊन हे कुटुंब मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांना भेटायला बाहेर गेलं. यावेळी पोलिसांनी त्यांना रोखले. त्यानंतर रुग्णासाठी बेडची व्यवस्था केली पण वाटेतच रुग्णाचा मृत्यू झाला.
बेंगलुरू बाहेरील रामोहल्ली येथे राहणारे सतीश (वय 45) याची प्रकृती चिंताजनक झाली. त्यांची पत्नी मंजुलता यांनी सतीश यांना रूग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल केले. पण बेड नसल्याचं सांगत त्यांना परत पाठवण्यात आले. मंजुलता म्हणतात की, ''दहा रुग्णालयांमध्ये विचारण्या केल्यानंतर बेड मिळाली नाही. त्यावेळी आम्हाला एकच मार्ग दिसला. म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांना विनंती करण्यासाठी त्यांच्या घरा बाहेर गेलो.'' मुख्यंमंत्र्याचे निवास कावेरीसमोर पोलिस दलाने मंजुलता यांना अडवले.
हात जोडून विनवणी केली
मंजुलता या हात जोडून ती पोलिसांना सांगत राहिल्या, ''माझ्या पतीच्या उपचाराचा सर्व खर्च मी उचलणार आहे. माझ्यासाठी फक्त एका आयसीयू बेडची व्यवस्था करा जेणेकरून माझ्या पतीवर उपचार केले जाऊ शकतात. त्यानंतर एमएस रामा हॉस्पिटलमध्ये बेडची व्यवस्था केली. '' ही महिला पतीसमवेत रुग्णालयाच्या दिशेने गेली, पण तिचा पती वाटेतच मरण पावला. कोरोनाची सौम्य लक्षणं असल्यास चुकूनही करू नका CT-SCAN; एम्स संचालकांचा धोक्याचा इशारा
रात्री १ वाजल्यापासून शोधत होते बेड
मंजुलता यांनी सांगितले की, '' माझे पती एका प्रायव्हेट कंपनीत कामाला होते. रात्री १ वाजेपासून बेड शोधायला सुरूवात केली होती. माझे पती कोरोना पॉझिटिव्ह आल्याचं कळताच आम्ही सगळे होम आयसोलेशनमध्ये होतो. त्यांची तब्येत जास्त खराब झाल्यामुळे रुग्णवाहिका तातडीनं बोलावण्यात आली. माझे दोन भाऊ आणि कुटुंबातील इतर लोक बेड शोधण्याचा प्रयत्न करत होते. रात्रभर फिरल्यानंतरही बेड उपलब्ध न झाल्यानं आम्ही सकाळी मुख्यंमंत्र्यांच्या घराबाहेर पोहोचलो.'' अरे व्वा! टेक महिंद्रानं विकसित केलं कोरोनाचा खात्मा करणारं औषध; लवकरच पेटंट मिळणार