Coronavirus : धक्कादायक! दारुची दुकानं बंद असल्याने 5 जणांची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2020 10:14 AM2020-03-29T10:14:09+5:302020-03-29T10:22:49+5:30
Coronavirus : दारुची दुकानं बंद असल्यामुळे पाच जणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
तिरुवनंतपुरम - भारतातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत असून आतापर्यंत 20 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या ही 900 वर पोहोचली आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने लोकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. याच दरम्यान जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्यात आली आहेत. मात्र इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे देशातील तळीरामांची अडचण झाली आहे.
दारुची दुकानं बंद असल्यामुळे पाच जणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. केरळमध्ये गेल्या 5 दिवसांमध्ये 5 जणांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. यातील एकाचा मृत्यू झाला असून इतर चौघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दारू न मिळाल्याने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल लोक उचलत असल्याचं म्हटलं जात आहे. तसेच गेल्या काही दिवसांत केरळमधील व्यसनमुक्ती केंद्र आणि सरकारी रुग्णालयात मानसोपचारतज्ज्ञांकडे तपासायला येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.
Coronavirus : लॉकडाऊनचे तीन तेरा! खरेदीसाठी नागरिकांची झुंबडhttps://t.co/DhAqZl4Zgz#CoronaInMaharashtra#CoronaLockdown
— Lokmat (@MiLOKMAT) March 29, 2020
केरळच्या आरोग्यमंत्री के. के. शैलजा यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये कोरोनाग्रस्तांवर योग्य उपचार सुरू आहेत. दारुशी संबंधित असणाऱ्या सर्व रुग्णांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे. गरजेनुसार या रुग्णांना तालुका किंवा जिल्हा पातळीवरील रुग्णालयात आणता येईल, यासाठी प्रत्येक रुग्णालयात 20 बेड स्वतंत्र ठेवण्यात आले आहेत.'
राज्याच्या नशामुक्ती कार्यक्रमाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी. राजीव यांनी दारू सोडवण्यासाठी येणाऱ्या रुग्णांसाठी आम्ही व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये टेलिकाऊन्सिलींगची सोय केली आहे. शनिवारी किमान 100 लोकं गंभीर अवस्थेत आमच्या केंद्रावर आली होती. या सर्वांना त्वरित वैद्यकीय मदतीची गरज होती. गरज पडल्यास यासाठी आम्ही खासगी डॉक्टरांचीही मदत घेत आहोत असं सांगितलं. तसेच काही जणांना दररोज दारू पिण्याची सवय असते, त्यांना दारू मिळाली नाही की त्यांच्यात नैराश्य यायला सुरुवात होते. यामधून मनात आत्महत्येचे विचार येतात. थरथरणे, चक्कर येणे, घाम येणे अशी लक्षणं सध्या केरळमधील व्यसनमुक्ती केंद्रात येणाऱ्या रुग्णांमध्ये आढळत असल्याचं देखील राजीव यांनी म्हटलं आहे.
चिंताजनक! भारतात एका दिवसात कोरोनाचे १९४ रुग्ण आढळले; कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली #CoronaUpdatehttps://t.co/TK4w3MBgwT
— Lokmat (@MiLOKMAT) March 29, 2020
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : लॉकडाऊनचे तीन तेरा! खरेदीसाठी नागरिकांची झुंबड
Coronavirus: चिंताजनक! भारतात एका दिवसात कोरोनाचे १९४ रुग्ण आढळले; कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली
Coronavirus: कोरोनाने घेतला चिमुकल्याचा बळी; जगातील पहिलीच ह्दयद्रावक घटना
जगातले सगळ्यात महाभयंकर व्हायरस, कोरोनाच्या आधी यांनी घातलेलं थैमान