शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत आरोपांवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
6
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
7
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
8
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
9
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
10
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
11
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
13
व्यवसाय, बंगला अन् २० एकर फार्महाऊस; मुलीनं दिली जाहिरात 'अस्सा नवरा हवा'
14
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
15
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
16
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
17
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
18
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
19
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
20
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात

CoronaVirus: "पायाभूत सुविधा उभारताना यापुढे ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ अनिवार्य"

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2020 4:29 AM

‘कोविड-१९’ मधून धडा न घेतल्यास भविष्य भयावह- पी. एस. उत्तरवार :

- टेकचंद सोनवणे नवी दिल्ली : ‘कोविड-१९’सारख्या महामारीतून धडा घेऊन आता यापुढे पायाभूत सुविधांचा विकास करताना फिजिकल डिस्टन्सिंगचा अगोदर विचार लागेल. ते राखले जाईल, अशा पद्धतीनेच विकास आराखडा बनवावा लागेल. यातून गृहनिर्माण क्षेत्रदेखील सुटणार नाही. एकूणच वर्क कल्चरबरोबरच पायाभूत सुविधांचे डिझाइनदेखील बदललेले असेल, असे दिल्ली विकास प्राधिकरणाचे माजी अतिरिक्त आयुक्त पी. एस. उत्तरवार यांनी ‘लोकमत’ला सांगितले.मूळ चंद्रपूरचे रहिवासी असलेले उत्तरवार ३ दशकांपासून नगर नियोजनात काम करीत असून, सध्या रेल्वे स्थानक विकास योजनेचे आरेखन तज्ज्ञ आहेत. या भयंकर आजारातून आपण धडा घेणार नसू तर भविष्य भयावह आहे, असा इशारा सुरुवातीलाच देऊन उत्तरवार म्हणाले की, पायाभूत सुविधांचा सर्वोच्च विकास झालेल्या देशांनाही कोरोनाचे संकट पेलता आलेले नाही. जगभरात त्यामुळे पायाभूत सुविधांची संरचना बदलेल.भारताला सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, कार्यालय व रहिवास इमारतींची रचना बदलावी लागेल. पायाभूत सुविधा उभारताना केवळ नफाकेंद्रित मॉडेल आता टिकणार नाही.शॉपिंग मॉल्सची रचना बदलेल. रेस्टॉरेंट, हॉटेल, फिरण्याच्या जागांची रचना बदलण्यात येईल. तेथे उच्च दर्जाची स्वच्छता राखावीच लागेल. चित्रपगृहदेखील छोटी होतील. कमी गुंतवणुकीत आधुनिक सुविधा हेच स्वरूप असेल. रेल्वेमध्ये तिकीट तपासण्याऐवजी क्यूआर कोड असायला हवा. लिफ्टमध्ये असलेला कोड तुम्ही मोबाईलवर स्कॅन करायचा व इच्छित मजल्यावर जायचे. तंत्रज्ञानकेंद्रित पायाभूत सुविधांचे जग जवळ करावे लागेल, असेही उत्तरवार म्हणाले.बिल्डरची जबाबदारी वाढणारगृहनिमार्णाविषयी ते म्हणाले की, दाटीवाटीने घरे उभारायची, कमी जागेत जास्तीत जास्त घरांमधून नफा कमवायचा हे बिल्डरांचे व्यावसायिक धोरण टिकणार नाही. सोसायटी स्थापन झाली, की काम संपले, हेही नाही चालणार. बांधकाम साईटवर काम करणारे कुठे जातात, याचा विचार करावाच लागेल. बिल्डरची जबाबदारी वाढेल.नव्या कार्यसंस्कृतीचे आगमनआता तर ‘वर्क फ्रॉम होम’ कल्चर वाढले. कार्यालयासाठी मोठ्या जागेची गरज नसल्याचा ट्रेंड वाढू लागला. व्हिडीओ कॉन्फरन्सिंग वाढल्या. इंटरनेटचा वापर वाढल्याने फाईल्सला लागणारी जागाही वाचेल. हे ‘वर्क कल्चर’ रोजगारही कमी करेल. पण ‘एकाच ठिकाणी अनेक वर्षे एकच काम’ हे कल्चर बदलेल. वर्षातून काही महिनेच पगार मिळेल. पायाभूत सुविधांमधील बदल नवी कार्यसंस्कृतीही घेवून येतील.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या