नवी दिल्ली : दिल्लीमध्ये कोरोनाचे चार रुग्ण प्लाझ्मा थेरपीमुळे बरे झाल्याचा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दावा केल्यानंतर सर्वच राज्यांमध्ये याची तयारी सुरु झाली. अमेरिकेतही या थेरपीचे प्रयोग केले जात आहेत. बऱ्या झालेल्या रुग्णांचे प्लाझ्मा घेऊन त्याद्वारे रुग्णांवर उपचार करण्याची ही पद्धती हा काही कोरोनावरील खात्रीशीर उपचार नसल्याचे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. तसेच राज्य सरकारांना सबुरीने घेण्याचा सल्ला दिला आहे.
देशभरात गेल्या काही दिवसांपासून प्लाझ्मा थेरपी एक चर्चेचा विषय ठरली आहे. यामुळे आरोग्य मंत्रालयाला खुलासा करावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने प्लाझा थेरपीचे उपचार हा एक प्रयोग आहे. प्लाझ्मामुळे कोरोना बरा होतो याचा कोणताही पुरावा नाही. केवळ उपचारासाठी मदत म्हणून याचा वापर मर्यादित असावा, असे आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी म्हटले आहे.
आयसीएमआरने कोरोनावर प्लाझ्माचा उपचार किती प्रभावी आहे हे पाहण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर एक अभ्यास सुरु केला आहे. जोपर्यंत आयसीएमआर पुराव्यांसह निष्कर्षावर येत नाही तो पर्यंत प्लाझ्मा थेरपीचा उपयोग केवळ प्रयोग किंवा परीक्षणाच्या उद्देशाएवढाच मर्यादित असावा, अशी सूचना अग्रवाल यांनी केली आहे.
दिल्लीच्या खासगी हॉस्पिटलच्या दाव्यानंतर देशातील अनेक ठिकाणी प्लाझ्मा थेरपीचा उपचार सुरु करण्यात आला होता, जो धोकादायक होता. यामुळे उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, हरियाणामध्येही हे प्रयोग सुरु केले गेले. तिथेही रुग्ण बरे झाल्याचे दावे झाले. मात्र, यावर आता केंद्र सरकारनेच खुलासा केला आहे.
देशभरात गेल्या २४ तासांत १५९४ नवीन रुग्ण सापडले असून ५१ जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण रुग्णांची संख्या २९९७४ झाली असून यामध्ये २२०१० रुग्ण उपचार घेत आहेत. तर ७०२७ रुग्ण बरे झाले असून एकूण ९३७ जणांचा मृत्यू झाला आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या वाचा...
CoronaVirus पुण्याच्या प्रसिद्ध कंपनीने घेतली मोठी 'रिस्क'; 1000 रुपयांत कोरोना लस आणणार
आनंद महिंद्रांवर आली 'ते' ट्विट डिलीट करण्याची वेळ; नम्रतेने माफीही मागितली
छत्तीसगडमध्ये आकाशातून घरांवर 'गोळीबार'; छपराच्या चिंधड्या उडाल्या
कोरोनाची लस चोरण्यासाठी चीनचा खटाटोप; अमेरिकेवर मोठा सायबर हल्ला
CoronaVirus धोक्याचे! कोरोना दिवसेंदिवस अवतार बदलतोय; ११ वे रुप खूपच खतरनाक
CoronaVirus शारीरिक संबंधाद्वारे कोरोना पसरतो? वुहानमध्ये संशोधन