शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

CoronaVirus: देशातील लॉकडाऊन ३ मेपर्यंत कायम राहणार;  पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2020 10:17 AM

coronavirus: कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय

नवी दिल्ली: देशात लागू असलेला लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढवत असल्याची मोठी घोषणा पंतप्रधान मोदींनी केली आहे. राज्य सरकारांनी, स्थानिक स्वराज्य संस्थांनी उत्तम काम केलं आहे. प्रत्येकानं जबाबदारी ओळखून योगदान दिलं आहे. मात्र तरीही कोरोना पसरतो आहे. कमीत कमी नुकसान व्हावं, लोकांच्या अडचणी कमी करण्यासाठी राज्यांसोबत चर्चा केली. काही राज्यांनी लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतल्याची घोषणा मोदींनी केली.योग्य वेळी घेतलेल्या निर्णयांमुळे, लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंगमुळे आपली स्थिती बलाढ्य देशांच्या तुलनेत चांगली असल्याचं मोदी म्हणाले. आपली तुलना कोणत्याही देशाशी तुलना करणं योग्य ठरणार नाही. पण जगातील बलाढ्य देशांशी तुलना करता आपण अतिशय चांगल्या स्थितीत आहोत. महिना दीड महिन्यापूर्वी बरेचसे देश आपल्या बरोबरीत होते. मात्र आत्ता तिथे कोरोनाचे रुग्ण २५ ते ३० पट आहेत. मृतांचा आकडा हजारोंच्या घरात आहे. आपण योग्य वेळी निर्णय घेतले नसते, तर आपली स्थिती काय असली असती, याची कल्पनाही करवत नाही. मागील दिवसांमधील स्थिती पाहिल्यास, आपण जे केलंय ते योग्य होतं याची खात्री पटते. लॉकडाऊन, सोशल डिस्टन्सिंगचा फायदा देशाला झाला. त्याची आर्थिक किंमत आपण चुकवली. पण देशाच्या नागरिकांच्या जीवापुढे ती किंमत काहीच नाही. अतिशय कमी संसाधनं असताना आपण उत्तम कामगिरी केली. त्याची जगभरात चर्चा होत आहे, अशा शब्दांत मोदींनी देशवासीयांनी दाखवलेल्या संयमाचं कौतुक केलं.कोरोनाविरुद्धच्या लढ्यात एकजुटीनं लढत असल्याचं म्हणत हीच बाबासाहेब आंबेडकरांना वाहिलेली खरी श्रद्धांजली आहे, असं पंतप्रधान म्हणाले. या संकटकाळात देश मोठ्या मजबुतीनं लढतोय. देशवासीयांची तपस्या, त्यागामुळेच हे शक्य झालंय. कोरोना नियंत्रणात आणण्यात सगळ्यांची भूमिका महत्त्वाची आहे. देशातली जनता मोठ्या कष्टानं देशाला वाचवतेय. या काळात देशवासीयांना सहन कराव्या लागणाऱ्या समस्यांची मला जाणीव आहे. मात्र अडथळे येऊनही सगळे जण कर्तव्य बजावत आहेत. बाबासाहेब आंबेजकर यांची आज जयंती आहे. आपण करत असलेले सामूदायिक प्रयत्न हीच बाबासाहेबांना वाहिलेली खरी श्रद्धांजली आहे, असं मोदींनी म्हटलं.

धक्कादायक! जितेंद्र आव्हाडांना तीन दिवसांपूर्वीच कोरोनाची लागण; नगरसेवकाचा दावा

धक्कादायक! भारतासाठी येणारे टेस्टिंग किटचे जहाज अमेरिकेला पाठविले; WHO वर गंभीर आरोप

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या