नवी दिल्लीः कोरोनाच्या संकटानं देशासमोर मोठी समस्या निर्माण केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सर्व ग्रामपंचायतीच्या प्रमुखांना संबोधित केले. पंचायती राज दिनानिमित्त पंतप्रधानांनी नवीन ई-गाव स्वराज पोर्टल आणि अॅप लाँच केले. या पोर्टलच्या माध्यमातून ग्रामपंचायतींचा प्रश्न, त्यासंबंधित माहिती एकाच ठिकाणी मिळणार आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वामित्व योजनेचीही घोषणा केली आहे. पंतप्रधान म्हणाले की, कोरोना संकटाच्या वेळी गावकऱ्यांनी जगाला मोठा संदेश दिला आहे. ग्रामस्थांनी 'दोन यार्ड' म्हणजेच ६ फुटांचं अंतर राखावं, असं आवाहनही मोदींनी गावकऱ्यांना केलं आहे.पंतप्रधान मोदींनी स्वामित्व योजना केली सुरू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशातील ग्रामपंचायतींच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी मोदींनी स्वामित्व योजनेचीदेखील सुरुवात करत असल्याची त्यांना माहिती दिली. 5 ते 6 वर्षांपूर्वी देशातील फक्त १०० पंचायती ब्रॉडबँडने जोडल्या गेल्या होत्या, परंतु आज ही सुविधा सव्वा लाख पंचायतींपर्यंत पोहोचली आहे.
Coronavirus : पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून स्वामित्व योजनेची घोषणा, गावागावांना होणार जबरदस्त फायदा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2020 1:35 PM
ग्रामस्थांनी 'दोन यार्ड' म्हणजेच ६ फुटांचं अंतर राखावं, असं आवाहनही मोदींनी गावकऱ्यांना केलं आहे.
ठळक मुद्देकोरोनाच्या संकटानं देशासमोर मोठी समस्या निर्माण केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सर्व ग्रामपंचायतीच्या प्रमुखांना संबोधित केले. पंचायती राज दिनानिमित्त पंतप्रधानांनी नवीन ई-गाव स्वराज पोर्टल आणि अॅप लाँच केले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वामित्व योजनेचीही घोषणा केली आहे.