नवी दिल्ली - सुमारे सव्वा दोन महिने चाललेल्या लॉकडाऊननंतर देश अनलॉक करण्याची प्रक्रिया हळूहळू सुरू झालेली असतानाच देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येने तीन लाखांचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळवण्याचे गंभीर आव्हान आरोग्य यंत्रणा आणि सरकारसमोर उभे राहिले आहे. दरम्यान, देश अनलॉक करण्याच्या प्रक्रियेस सुरुवात झाल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी २१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. यावेळी पंतप्रधान आणि विविध राज्यांच्या मु्ख्यमंत्र्यांमध्ये सध्याच्या परिस्थितीबाबत चर्चा होऊन कोरोनाला रोखण्यासाठीची पुढील रणनीती ठरण्याची शक्यता आहे.
१६ आणि १७ जून रोजी होणाऱ्या या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाब, आसाम, केरळ, उत्तराखंड, झारखंड, छत्तीसगड, त्रिपुरा, हिमाचल प्रदेश, गोवा, मणिपूर, नागालँड, मेघालय, पुदुच्चेरी, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची चर्चा करतील. तसेच चंदिगड, लडाख, दादरा नगर हवेली, अंदमान निकोबार, दमण दीव आणि लक्षद्विप या केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधीही या बैठकीत सहभागी होतील. तसेच १७ जून रोजी नरेंद्र मोदी हे महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरात, दिल्ली आणि राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतील.
इतर महत्त्वाच्या बातम्या