पाटणा : बिहार विधानसभेच्या आॅक्टोबर/नोव्हेंबरमध्ये घ्यायच्या निवडणुकीपर्यंत कोरोनाची साथ कदाचित आटोक्यात येणार नाही, हे गृहीत धरून साथीचा प्रसार रोखण्यासाठी सर्व खबरदारीसह ही निवडणूक घेण्याची तयारी निवडणूक आयोगाने सुरू केली आहे. मतदाराने मतदान करण्यासाठी मतदानयंत्राचे बटन हाताने दाबणे हे विषाणू संसर्गाचे मोठे संभाव्य कारण टाळण्यासाठी मतदाराने बोटाऐवजी काठीने बटन दाबण्याची सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे.राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एच.आर. श्रीवास्तव यांनी ही माहिती देताना सांगितले की, मतदानासाठी येणाऱ्या प्रत्येक मतदाराला मतदान यंत्राचे बटन दाबण्यासाठी एक छोटी काठी दिली जाईल आणि तो त्या काठीनेच बटन दाबेल याची खात्री केली जाईल.निवडणूक आयोगाने केलेल्या नव्या नियमानुसार कोरानाबाधित व ज्येष्ठ नागरिकांना टपाली मतदानाचा पर्याय देण्यात आला आहे. श्रीवास्तव यांच्या म्हणण्यानुसार यानुसार नेमके किती मततदार हा पर्याय निवडतील, ते आताच सांगता येणार नाही. तरीही त्यांची संख्या काही लाखांच्या घरात असू शकेल. यातील जे प्रत्यक्ष मतदानासाठी येतील त्यांची विशेष काळजी घ्यावी लागेल. हे नेहमीपेक्षा वेगळे व आव्हानात्मक काम असेल.श्रीवास्तव म्हणाले की, प्रत्येक मतदाराला हात स्वच्छ धुऊन मतदान केंद्रात येण्याचीही सर्व सोय केली जाईल, तसेच रांगेत उभ्या असलेल्या एखाद्या मतदाराने मास्क लावला नसेल, तर त्याला आयोगाकडून खादीचा तीनपदरी मास्कही दिला जाईल. शिवाय सर्व निवडणूक कर्मचाऱ्यांना निर्जंतुक केलेले हॅण्ड ग्लोव्हजही दिले जातील.नवे आव्हानसर्व निर्बंध व नियम पाळून निवडणूक घेणे हे एक नवे आव्हान असेल, असे सांगून ते म्हणाले की, रांगेत व मतदान केंद्रात ‘फिजकल डिस्टन्सिंग’ पाळता यावे यासाठी प्रत्येक मतदान केंद्रातील मतदारांची संख्या एक हजार एवढी मर्यादित करण्यात येईल. त्यामुळे नेहमीपेक्षा ४५ टक्के जास्त मतदान केंद्रे उभारावी लागतील.वृद्ध मतदारांची वर्गवारी६२ ते ६९ वर्षे ३३.२७ लाख७० ते ७२ वर्षे ८.७० लाख७३ ते ७९ वर्षे ३१ लाख८० ते ८९ वर्षे १०.५९ लाख९० ते ९९ वर्षे २.३० लाखशंभरीच्या पुढे १८ हजार
coronavirus: बिहारमध्ये काठीने बटन दाबून होणार मतदान! कोरोना संसर्ग रोखण्यासाठी खबरदारी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2020 3:11 AM