शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
5
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
6
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
7
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
8
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
9
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
10
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
11
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
12
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
13
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
15
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
16
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
17
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
18
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

Coronavirus: देशातील २४४ जिल्ह्यांचा पॉझिटिव्हिटी रेट २० टक्के; महाराष्ट्रात रुग्णसंख्या घटतेय, पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 7:07 AM

ॲस्ट्राझेनेकाचे दुष्परिणाम नगण्य; रक्ताच्या गाठी होण्याचे प्रमाण अत्यल्प, १५ राज्यांची मात्र सरकारला काळजी  

हरीश गुप्तानवी दिल्ली : देशात गेल्या काही दिवसांपासून कोविड-१९ रुग्णांच्या संख्येत घट होत असली तरी २४४ जिल्ह्यांत रुग्ण सकारात्मक (पॉझिटिव्हिटी रेट) निघण्याचे प्रमाण २० टक्क्यांच्या वर असल्यामुळे केंद्र सरकारला काळजी वाटत आहे. काही जिल्ह्यांत हीच टक्केवारी ३० टक्के आहे. देशातील ७१९ जिल्ह्यांपैकी ४७९ जिल्ह्यांत १० टक्क्यांपेक्षा जास्त दर असून, त्यातील २४४ जिल्ह्यांत हाच दर २० टक्के आहे. कर्नाटकमध्ये २७, तमिळनाडूत २४, राजस्थान, ओदिशा आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी १९ टक्के दर आहे. महाराष्ट्रात २० टक्क्यांच्या वर पॉझिटिव्हिटी दर असणाऱ्या जिल्ह्यांची संख्या १६ वर आली आहे.

३६ जिल्ह्यांच्या महाराष्ट्रात एकूण पॉझिटिव्हिटी दर हा २० टक्क्यांच्या खाली आहे, तर रुग्ण बरे होण्याचा दर हा सर्वात जास्त आहे. १६ मे रोजी राज्यात बरे झालेले रुग्ण होते ५९,३१८ तर नव्या रुग्णांची संख्या ३४,३८९ होती. देशात सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये २० टक्क्यांच्या वर पॉझिटिव्हिटी दर असलेला जिल्हा नाही. राज्यातील ७५ जिल्ह्यातील फक्त १४ जिल्ह्यांत हा दर १० टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

हरयाणा या लहान राज्यात एकूण २२पैकी १६ जिल्ह्यांत पॉझिटिव्हिटी दर हा २० टक्क्यांच्या वर आहे. २३ जिल्ह्यांच्या पंजाबमध्ये २१ जिल्ह्यांत हा दर १० टक्क्यांच्या वर उर्वरित जिल्ह्यांत तो २० टक्क्यांच्या पुढे आहे. दिल्लीतील कोविड-१९ रुग्णांची संख्या कमी होत असली तरी तीन जिल्ह्यांत २० टक्क्यांच्या वर, तर  आठ जिल्ह्यांत तो १० टक्क्यांच्या वर आहे. केंद्रीय आरोग्य मंंत्रालयातील अधिकृत सुत्रांनी म्हटले की, देशात गेल्या तीन दिवसांत नव्या रुग्णांची संख्या १० टक्क्यांनी कमी झाली असली तरी पॉझिटिव्हिटी दरात घट फार मंद गतीने होत आहे.

१६ जानेवारीपासून भारतात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. भारतात या लसीचे ‘कोविशिल्ड’ या नावाने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियातर्फे उत्पादन करण्यात येते. ही लस दिल्यानंतर काही प्रमाणात दुष्परिणाम जाणवतात. भारतात हे प्रमाण १० लाख डोसमागे ०.६१ असे नगण्य आहे. त्या तुलनेत ब्रिटनमध्ये हे प्रमाण दहा लाख डोसमागे चार असे आहे. जर्मनीमध्ये हे प्रमाण ब्रिटनच्या अडीचपट जास्त आहे. कोव्हॅक्सिन लसीचेही धोकादायक दुष्परिणाम दिसून आले नाहीत. ॲस्ट्राझेनेकाची लस दिल्यानंतर काही जणांमध्ये रक्ताच्या गाठी निर्माण झाल्याचे आढळून आले होते. मात्र आशियाई तसेच दक्षिण आशियाई लोकांमध्ये हे प्रमाण सत्तर टक्के कमी आहे. भारतात ही लस ‘कोविशिल्ड’ या नावाने आहे. ॲस्ट्राझेनेका आणि ऑक्सफोर्डने विकसित केलेल्या लसीमुळे रक्तस्राव आणि रक्ताच्या गाठी निर्माण होत असल्याचे आढळले होते. मात्र भारतात हे प्रमाण अतिशय कमी असल्याचे लसीकरण दुष्परिणाम समितीने म्हटले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या