बक्सर (बिहार) - कोरोना विषाणूच्या फैलावामुळे देशभरात चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे. कोरोनावर लस शोधण्यासाठी शास्त्रज्ञ दिवसरात्र एक करत आहेत. तर कोरोनाबाधितांना बरे करण्यासाठी डॉक्टर आणि इतर वैद्यकीय कर्मचारी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. यादरम्यान, कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी बिहारमधील काही गावांमध्ये जे काही करण्यात आले त्याबाबत ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्यावाचून राहणार नाही.
कोरोनाचा विषाणूचा प्रकोप टाळण्यासाठी बिहारमधील बक्सर जिल्ह्यातील काही गावांमधील महिलांनी चक्क कोरोना महामारीचे चक्क कोरोनामाई असे नामकरण केले. तसेच तिच्या पूजेसाठी गंगा नदीच्या किनारी धाव घेतली. तसेच गंगास्नान करून या महिलांनी कोरोनामाईची ९ लाडू, नऊ फुले आणि ९ अगरबत्ती लावून शास्त्रशुद्ध पूजा केली आणि हे साहित्य गंगाकिनारी पुरून टाकले. दरम्यान, हा प्रकार पाहून अनेकांना धक्का बसला आहे. दरम्यान, हा प्रकार सातत्याने सुरू असून अशी पूजा करण्यासाठी गंगाकिनारी महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.
आता या महिलांना या पूजेबाबत कुठून माहिती मिळाली याबाबत अधिक शोध घेतला असता अजून धक्कादायक माहिती समोर आली आहे. याबाबत पूजा करणाऱ्ा एका महिलेने सांगितले की, आम्हाला एका व्हिडीओच्या माध्यमातून ही माहिती मिळाली. कोरोनाचा प्रकोप कमी करायचा असेल तर त्याची लाडू, फूल आणि तीळ वाहून पूजा करावी लागेल, त्यानंतरच त्याचा प्रकोप कमी होईल,असे या व्हिडीओमध्ये सांगण्यात आले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
coronavirus: चिंताजनक! कोरोनाचा ग्रामीण भागातही फैलाव; काही राज्यांत शहरांपेक्षा गावात अधिक रुग्ण
२६ व्या वर्षी खासदार, ४५ व्या वर्षी मुख्यमंत्री! अशी आहे योगी आदित्यनाथ यांची कारकीर्द
कोरोना आला, वादळ झाले, आता आकाशातून पृथ्वीवर येणार तिहेरी संकट
coronavirus: कोरोनामुळे तिजोरीत खडखडाट; मोदी सरकारकडून नव्या योजनांना मार्च २०२१ पर्यंत स्थगिती
दरम्यान, श्रद्धा आणि अंधश्रद्धेच्या वादाच्या पलीकडे जात या महिला कोरोना विषाणूचा प्रकोक कमी करण्यासाठी कोरोना माईची पूजा करणे हेच आपले प्रथम कर्तव्य मानत आहेत. तसेच त्यासाठी सोमवार आणि शुक्रवार हे वारही ठरवण्यात आले आहेत. दरम्यान, या संदर्भातील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर बिहारमधील संपूर्ण बक्सर जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या पूजांना ऊत आला आहे.