डब्लिन - जगभरात कोरोनामुळे गंभीर संकट निर्माण झाले आहे. काही अपवाद वगळता जगातील बाहुतांश देश कोरोनाचा सामना करत आहेत. दरम्यान, देशातील कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या आणि डॉक्टरांवर येत असलेल्या ताणाच्या पार्श्वभूमीवर आयर्लंडचेपंतप्रधान लिओ वराडकर यांनी स्वतः रुग्णसेवेसाठी योगदान देण्याचा निर्णय घेतला. पेशाने डॉक्टर असलेले लिओ वराडकर कोरोनाचा वाढत्या फैलावाचा पार्श्वभूमीवर स्वतः वराडकर रुग्णसेवा करतील.
पेशाने डॉक्टर असलेल्या वराडकर यांनी सक्रिय राजकारणात उतरण्यापूर्वी अनेक वर्षे डॉक्टर म्हणून सेवा दिली होती. त्यानंतर 2013 मध्ये त्यांनी वैद्यकीय सेवा क्षेत्र सोडून राजकारणात प्रवेश केला होता. त्यानंतर 2014 मध्ये ते आयर्लंडचे आरोग्यमंत्री बनले होते. आयर्लंडच्या हेल्थ सर्विसच्या अधिकाऱ्यांनी देशातील कोरोनच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर माजी आरोग्य कर्मचाऱ्यांनी नोंदणी करून परत सेवेत यावे, असे आवाहन केले होते.
आयरिश टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार देशात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढू लागल्याने देशाच्या पंतप्रधानांनी पुन्हा एकदा आपली मेडिकल नावनोंदणी केली आहे. पंतप्रधान आपल्या वैद्यकीय पात्रतेनुसार आठवड्यातील काही आठवडे काम करतील. तसेच ते डॉक्टरांकडून देण्यात येणाऱ्या फोन सर्विसमध्येही सहभागी होतील.
दरम्यान, लिओ वराडकर यांची कौटुंबिक पार्श्वभूमी डॉक्टरी पैशाची आहे. त्यांचे वडील डॉक्टर आहेत. तर आणि नर्स आहे. तर लिओ यांनीही करियर करण्यासाठी डॉक्टरी पेशाचीच निवड केली होती. पुढे ते राजकारणात उतरून आयर्लंडचे पंतप्रधान झाले होते.