शहरं
Join us  
Trending Stories
1
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
2
त्यांनी बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण गहाण ठेवले होते; शिंदेंसाठी CM शिंदेंची बॅटिंग, ठाकरेंवर हल्ला
3
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर; स्पष्टच बोलले
4
भाजपाला मोठा धक्का, अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या माजी महिला खासदाराचा पक्षाला राम राम
5
“कोल्हापूर उत्तर आम्ही ७ वेळा जिंकली, ७ दिवस भांडलो पण काँग्रेसने जागा सोडली नाही”: संजय राऊत
6
नवाब मलिकांवरून अजितदादा गटाने भाजपा-शिंदे गटाला फटकारलं; "कुणाला काही वाटू दे..."
7
राजेश लाटकर घेणार उद्धव ठाकरेंची भेट! कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग
8
काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून यंदा काँग्रेसचेच चिन्ह झाले 'हद्दपार'
9
AUS vs IND : भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा! टीम इंडियासमोर मोठे आव्हान, शिखर धवननं दिला धीर
10
Sameer Bhujbal : दहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेत समीर भुजबळ यांना दिला पाठिंबा
11
विराट कोहलीसाठी सिक्सर किंग युवीनं शेअर केली खास पोस्ट
12
महाले यांची माघार; भुजबळ, आहेर, गावित ठाम! दिंडोरीत नरहरी झिरवाळ यांना दिलासा
13
"मी यापुढे मराठी बोलणार नाही..."; रेल्वे टीसीचा मुजोरपणा, मराठी माणसाला धमकावलं
14
चातुर्मासाची सांगता: कार्तिकी एकादशी कधी आहे? विष्णुप्रबोधोत्सव महात्म्य अन् मान्यता
15
बारामतीचं राजकीय तापमान वाढणार: अजित पवारांना शह देण्यासाठी शरद पवार मैदानात; आज ६ ठिकाणी सभा!
16
Niva Bupa IPO : 'या' दिग्गज हेल्थ इन्शूरन्स कंपनीचा IPO येणार; किंमत किती, कधीपासून करता येणार अर्ज?
17
...यासाठी बाळासाहेब ठाकरे राज ठाकरेंना माफ करणार नाहीत; संजय राऊत भडकले
18
आजपासून महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ; पहिली सभा कोल्हापुरात, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार!
19
शुक्राचा गुरु राशीत प्रवेश: १० राशींवर धनलक्ष्मी कृपा, अचानक धनलाभाचे योग; शुभ-लाभाचा काळ!
20
Devayani Farande : मध्य नाशिक मतदारसंघात बंडखोरांच्या माघारीचा भाजपाच्या देवयानी फरांदेंना फायदा

Coronavirus: कोरोनावर पंतप्रधान मोदींची महत्त्वपूर्ण बैठक, औषधे आणि लसीकरणाबाबत दिले महत्त्वपूर्ण आदेश 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2021 5:25 PM

Coronavirus in India: देशभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे थैमान कसे रोखायचे याचे आव्हान केंद्र सरकारसमोर निर्माण झाले आहे. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा एकदा एक महत्त्वपूर्ण मोठी बैठक घेतली.

नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या फैलावामुळे देशासमोर गंभीर परिस्थिती निर्माम झाली आहे. तसेच देशभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेचे थैमान कसे रोखायचे याचे आव्हान केंद्र सरकारसमोर निर्माण झाले आहे. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा एकदा एक महत्त्वपूर्ण मोठी बैठक घेतली. यावेळी पंतप्रधानांना प्रत्येक राज्यातील कोरोनाच्या स्थितीची माहिती देण्यात आली. या बैठकीदरम्यान पंतप्रधानांनी औषधांची टंचाई आणि लसीकरणाबाबत महत्त्वपूर्ण आदेश दिले. राज्यांनी कोरोना लसीकरणाची गती कमी होऊ देऊ नये, अशी सूचना मोदींनी यावेळी केली. 

याबाबत माहिती देताना पीएमओने सांगितले की, पंतप्रधानांसमोर देशातील विविध राज्यामधील कोरोनाच्या प्रकोपाचे एक व्यापक चित्र मांडण्यात आले. त्यांना १ लाखांहून अधिक अॅक्टिव्ह रुग्ण असलेल्या १२ राज्यांची माहिती देण्यात आली. त्याबरोबरच अधिक रुग्णसंख्या असलेल्या जिल्ह्यांबाबतही माहिती देण्यात आली. पंतप्रधानांना राज्यांकडून उभारण्यात आलेल्या पायाभूत आरोग्य सुविधांची माहिती दिली गेली. यावेळी पंतप्रधान मोदींनी आरोग्य सेवांच्या पायाभूत चौकटीत सुधारणा करण्यासाठी राज्यांना मदत आणि मार्गदर्शन केले गेले पाहिजे, असे सांगितले.  पंतप्रधान मोदींच्या या महत्त्वपूर्ण बैठकीमध्ये कोरोनाचा फैलाव थांबवण्यासाठी त्वरित आणि समग्र उपाय सुनिश्चित करण्यासाठीच्या उपायांवरही चर्चा झाली. पंतप्रधान मोदींनी सांगितले की, राज्यांना अशा जिल्ह्यांची ओळख पटवण्याचा सल्ला देण्यात आला होता जिथे पॉझिटिव्हिटी रेट हा १० टक्क्यांहून अधिक आहे आणि ऑक्सिजन सपोर्टेड किंवा आयसीयू बेड ६० टक्क्यांहून अधिक भरलेला आहे.  या बैठकीत मोदींनी औषधांच्या उपलब्धतेचाही आढावा घेतला. त्यांना रेमडेसिवीरसह अन्य औषधांच्या उत्पादनात वेगाने होत असलेल्या वाढीबाबत माहिती देण्यात आली. पंतप्रधान मोदींनी पुढच्या काही महिन्यांमध्ये लसीचे उत्पादन वाढवण्यासाठी लसीकरण आणि त्याच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. 

राज्यांना आतापर्यंत १७.७ कोटी लसी पाठवण्यात आल्या आहेत. यासोबतच पंतप्रधांनानी राज्यांमध्ये होल असलेल्या लसीकरणाचा आढावा घेतला. ४५ वर्षांवरील सुमारे ३१ टक्के लोकांना कोरोना लसीचा किमान एक डोस दिला गेला आहे. यावेळी पंतप्रधानांनी सांगितले की, लसीकरणाची गती कमी होता कामा नये यासाठी राज्यांना सूचना दिली गेली पाहिजे. तसेच लॉकडाऊन असले तरी नागरिकांना लसीकरणाची सुविधा दिली गेली पाहिजे. तसेच लसीकरणाचे काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांना अन्य कामांकडे वळवता कामा नये.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदी