पणजी: ब्रिटनच्या राजघराण्याचे प्रिंस चार्ल्स यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. मात्र, त्यांच्यावर आयुर्वेदीक उपचार केल्याने ते ठणठणीत बरे झाले. रोगमुक्त झाल्याचा दावा केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी केला आहे.
बंगळूर येथील 'सौख्य' रिसॉर्टचे आयुर्वेदिक डॉक्टर माथाईज हे ब्रिटनमध्ये त्यांच्यावर उपचार करीत होते. त्यानीच ही माहिती आपल्याला दिल्याचे आयुष मंत्र्यांनी सांगितले. कोविड -19 वर आयुर्वेद व होमियोपथी उपचार उपलब्ध व्हावेत यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी कृती दलाची नियुक्त करण्यात आल्याचे ते म्हणाले.
कोरोना व्हायरसचे सावट गोव्यावरून दूर होताना दिसत आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी देशभरात करोना व्हायरसची प्रकरणे नव्याने आढळून आलेली दिसत असली तरी तो नियंत्रणात असल्याचे सांगितले.
संरक्षण मंत्रालयाने या लढाईत अत्यंत महत्त्वाची भुमिका बजावल्याचे ते म्हणाले. लष्कराची 9 हजार खाटांची इस्पितळे असल्याचे त्यांनी सांगितले. आतापर्यंत संरक्षण पीएसयूतून 40 कोटी रुपये देण्यात आले आहेत. आज देशात कोरोना व्हायरसमुळे 60 जणांचा मृत्यू झाल्याची खंत आहेच, परंतु हे संकट आता ओसरत असल्याचे नाईक यांनी सांगितले.