नवी दिल्ली : कोरोना व्हायरसमुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. यामुळे अनेकांचा रोजगार बुडाला आहे. नोकरीवर जाऊ शकत नसल्याने कंपन्या पगार करतील की नाही याचेही टेन्शन आलेले आहे. त्यातच भाजीपाला, किराणा महाग झाला आहे. यामुळे पुढील तीन महिने बँकांनी गृह, वाहन कर्जावरील हप्ता न घेण्याची विनंती रिझर्व्ह बँकेने केली होती. यावर ग्राहकांना मोठा दिलासा बँकांनी दिला आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी ग्राहकांना तीन महिने ईएमआय न भरण्यापासून सूट दिली आहे. या बँकांनी आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी शुक्रवारी दिलेल्या सूचनांचे पालन केले आहे. दास यांनी रिटेल आणि कृषी कर्जासह अन्य टर्म लोनचे हप्ते तीन महिने घेऊ नयेत असे आवाहन बँकांना केले होते. आता बँकांनी हे हप्ते मुदतवाढ करून भरण्याची सोय दिली आहे.
पंजाब नॅशनल बँकेने ट्वीट करून याची माहिती दिली आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर १ मार्च, २०२० ते ३१ मे २०२० पर्यंत येणाऱ्या कर्जाचे सर्व ईएमआय आणि कॅश क्रेडिट फॅसिलीटीवर व्याज न घेण्याच निर्णय घेतला आहे.
आरबीआयचे नवे नियम लागू करणारी स्टेट बँकही यामध्ये मागे नाही. आरबीआयनेही ट्वीट करून १ मार्च, २०२० ते ३१ मे २०२० पर्यंत सर्व EMI न घेण्यासाठी पाऊल उचलले आहे. तसेच वर्किंग कैपिटल फैसिलिटीजच्या व्याजालाही 30 जूनपर्यंत सूट देण्यात येणार आहे.
बँक ऑफ बड़ोदा
युनिअन बँक ऑफ इंडिया
कॅनरा बँक
कॉर्पोरेशन बँक
याशिवाय इंडियन बँक, यूको बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, आँध्र बँक, इंडियन ओवरसीज बँक, सिंडिकेट बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, अलाहाबाद बँक, बँक ऑफ इंडिया आणि आयडीबीआय बँकांनीही तीन महिने ईएमआय न घेण्याचा निर्णय घेतला आहे.
EMI ला तीन महिन्यांचा दिलासा म्हणजे नेमके काय? जाणून घ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरे