कोलकाता – देशात दिवसेंदिवस वाढत असणाऱ्या कोरोना महामारीमुळे लोकांमध्ये दहशतीचं वातावरण पसरलं आहे, अशातच काही जणांनी कोरोनाच्या नावाखाली लोकांना लुटण्याचे धंदे सुरु केले आहेत, अनेक ठिकाणी लाखो रुपयांपर्यत रुग्णालयांची बिले दिली जात आहेत. कोरोना म्हणजे कमाई अशाप्रकारे खासगी रुग्णालये, रुग्णवाहिका लोकांना लुबाडण्याचं काम करत आहेत.
अलीकडेच पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे एका रुग्णवाहिकेच्या चालकाचा मनमानी कारभार समोर आला आहे. कोरोना संक्रमित मुलांना ६ किमी अंतरावरील रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिकेने ९ हजार २०० रुपये भाडे मागितले. ही घटना कोलकातामधील हायप्रोफाईल परिसर पार्क सर्कस येथील आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार चालकाने मनमानी भाडे आकारले, हे भाडं देण्यास नकार दिल्याने कोरोना संक्रमित मुलांना आणि त्यांच्या आईला रुग्णवाहिकेतून खाली उतरवले.
यानंतर या प्रकरणात डॉक्टरांनी लक्ष घातल्यानंतर रुग्णवाहिका चालकाने २ हजार रुपये भाड्यात घेऊन जाण्यास तयार झाला, एक मुलगा ९ वर्षाचा आहे तर दुसऱा मुलगा अवघ्या ९ महिन्याचा आहे, दोघांवर सध्या पार्क सर्कस येथील इंस्टिट्यूट ऑफ चाइल्ड हेल्थ येथे उपचार सुरु होते असं मुलांच्या वडिलांनी सांगितले. या दोन्ही मुलांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यानंतर दोघांना आयसीएचमधून कोलकाता मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यास सांगितले. रुग्णवाहिका बोलवण्यात आली, पण ती येण्यास उशीर झाला. त्यानंतर मुलांना ६ किमी अंतरावर असणाऱ्या खासगी रुग्णालयात नेण्याचा निर्णय झाला.
पीडित मुलाच्या वडिलांच्या माहितीनुसार, सर्वजण रुग्णवाहिकेत बसलो, रुग्णवाहकाने ९ हजार २०० रुपये भाडे मागितले, इतकं भाडं देण्यास आम्ही असमर्थता दाखवली, त्यानंतर चालकाने माझ्या छोट्या मुलाचा ऑक्सिजन सपोर्ट काढून टाकला, त्यानंतर कोरोना संक्रमित मुलं आणि आईला रुग्णवाहिकेतून धक्का देऊन खाली उतरवले. आम्ही खूप विनवणी केली पण चालकाने ऐकलं नाही असा आरोप पीडितांनी केला. दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये कोरोनामुळे आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे, राज्यात कोरोना बाधितांची संख्या ५४ हजारांपेक्षा जास्त झाली आहे. जवळपास १३०० लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पण त्यासोबतच ३३ हजार ५०० हून अधिक रुग्ण कोरोनातून बरे झाल्याचं दिलासादायक चित्र आहे.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
“ज्याची कुवत सगळ्यात कमी लेखली गेली तोच पक्षाचा सर्वोच्च नेता अन् राज्याचा मुख्यमंत्री झाला”
तुकाराम मुंढेंना 'फुल सपोर्ट'; उद्धव ठाकरेंची 'जन की बात'
मी कोणाच्या उज्ज्वल भवितव्याच्या आड येत नाही, पण...; उद्धव ठाकरेंचा नेम अजित पवारांवर?
"अयोध्येला जाणार, राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात सहभागी होणार!" पण...