शहरं
Join us  
Trending Stories
1
"अशोक चव्हाणांना काँग्रेसने दोनदा मुख्यमंत्रीपद दिले पण पक्ष संकटात असताना ते भाजपात गेले"
2
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
3
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
4
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
5
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
6
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
7
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
8
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
9
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
10
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
11
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'
12
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल
14
भाजपने खोटी जाहिरात छापून आणली; काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार 
15
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
16
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं
17
प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याच्या बैठकीत राडा; साधुसंतांनी एकमेकांवर चालविल्या लाथाबुक्क्या
18
"याबाबत फडणवीस यांचं काय मत आहे?"; फोटो दाखवत पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल
19
नवऱ्याला सोडलं अन् बॉयफ्रेंडशी लग्न ठरवलं; वधू वाट पाहत होती पण वरात आलीच नाही, कारण...
20
भारतीय अधिकाऱ्यांनी घेतली अफगाणी संरक्षण मंत्र्याची भेट; पाकिस्तानची उडाली झोप...

Coronavirus: दिलासादायक! देशात घटली कोरोनाची R-व्हॅल्यू; मात्र मुंबई, बंगळुरू आणि चेन्नईसाठी धोका कायम

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 10:45 PM

Coronavirus in India: एकीकडे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत तर्कवितर्क लढवले जात असतानाच देशासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.

नवी दिल्ली - एकीकडे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत तर्कवितर्क लढवले जात असतानाच देशासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. देशातील कोविड-१९ चा आर व्हॅल्यू घटून १ टक्क्याच्या आत आला आहे. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस तो १.१७ होता. त्यानंतर १५ सप्टेंबरपर्यंत तो घटून ०.९२ झाला. तज्ज्ञांच्या मते यामधून देशात कोरोनाचा फैलाव होण्याचा वेग मंदावल्याचे स्पष्ट होत आहे. ( R-value of corona decreased in the country; However, the threat remains for Mumbai, Bangalore and Chennai)

मात्र मुंबई, कोलकाता, चेन्नई, बंगळुरूसारख्या मोठ्या शहरांमध्ये अजूनही आर व्हॅल्यू एक टक्क्याच्या आसपास आहे. दिल्ली आणि पुण्यामध्ये आर व्हॅल्यू अजूनही एक टक्क्यापेक्षा कमी आहे. तसेच कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण सापडत असलेल्या केरळ आणि महाराष्ट्रामधील आर व्हॅल्यूसुद्धा एक टक्क्यापेक्षा कमी आहे. ही बाब या दोन्ही राज्यांसाठी दिलासादायक आहे.

ऑगस्टच्या अखेरीस ही आर व्हॅल्यू १.१७ होती. ती ४ ते ७ सप्टेंबरदरम्यान घटून १.११ झाली. आणि तेव्हापासून ती १ टक्क्याच्या खाली आहे. गणितीय विज्ञान संस्था, चेन्नईचे सीताभ्रा सिन्हा यांनी सांगितले की, दिलासादायक बाब म्हणजे केरळ आणि महाराष्ट्रात सक्रिय रुग्णांची संख्या अधिक असूनही भारताचा रिप्रॉडक्शन नंबर सातत्याने १ पेक्षा कमी आहे. आकडेवारीनुसार मुंबईचा आर-व्हॅल्यू १.०९ आहे. चेन्नईचा १.११ आहे. कोलकाताचा १.०४ आहे तर बंगळुरूचा १.०६ आहे. भारतामध्ये कोरोनाची दुसरी लाट आली असताना ९ मार्च ते २१ एप्रिलपर्यंत देशातील एकूण आर व्हॅल्यू १.३७ होती.

रिप्रोडक्शन नंबर किंवा आर व्हॅल्यूमधून सरासरी किती लोकांना संसर्ग झाला आहे हे दाखवले जाते. दुसऱ्या भाषेत सांगायचे तर विषाणू किती वेगाने पसरतो आहे हे दाखवले जाते. देशात कोरोनाची दुसरी लाट थैमान घालत असताना बाधित रुग्णांच्या संख्येमुळे रुग्णालये आणि आरोग्याची पायाभूत चौकट कोलमडली होती. त्यानंतर आर व्हॅल्यूमध्ये सातत्याने घट होत चालली आहे. 

दरम्यान, आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशामधील रिकव्हरी रेट हा ९७.७५ टक्क्यांवर पोहोचला आहे. देशामधील साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट २.०८ आहे. जो गेल्या ८८ दिवसांपासून ३ टक्क्यांच्या आत आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत