नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्वीट करून सरकारला लॉकडाऊनमुळे थांबलेले अर्थचक्र सुरु करण्याचा सल्ला दिला आहे. महत्वाचे म्हणजे राहुल यांनी आज सकाळीच अर्थतज्ज्ञांशी लाईव्ह चर्चा केली होती. यानंतर त्यांनी मोदी सरकारला हा सल्ला दिला आहे.
यावरून भाजपाने राहुल गांधी यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. भाजपाने विचारले की, त्यांचा पक्ष केवळ वक्तव्ये करून किंवा भ्रम पसरवून कोरोनाशी लढणार आहे का, हे राहुल गांधी यांनी स्पष्ट करायला हवे. काँग्रेसच्या नेत्यांनी सांगावे की किती गरीबांना चिंतेतून जेवण, रेशन दिले असे आव्हानही देण्यात आले आहे.
दरम्यान राहुल गांधी यांनी आद नोबेल विजेते अर्थशास्त्रज्ञ अभिजीत बॅनर्जी यांच्याशी चर्चा केली. यानंतर त्यांनी देशभरातील कोरोनामुळे ठप्प झालेली अर्थव्यवस्था पुन्हा सुरु करण्यासाठी उपाय सुचविला आहे. यामध्ये त्यांनी देशातील पुरवठा साखळी पुन्हा सुरु करण्याचे म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या...
किंग जोंग उन 'प्रकट' काय झाले, रशियाने थेट वॉर मेडलने सन्मानित केले
चिंता वाढली! आज देशात सर्वाधिक कोरोनाग्रस्तांचा मृत्यू; २४ तासांत ३९०० नवे रुग्ण
दारु विक्रीतून राज्यांना उत्पन्न किती? आकडा पाहूनच 'झिंगाट' व्हाल