Coronavirus: पीएम केअर्स फंडाला 151 कोटी देऊ शकता; मग मजुरांकडून तिकिटाचे पैसे का घेता?- राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2020 10:27 AM2020-05-04T10:27:02+5:302020-05-04T10:30:30+5:30
रेल्वे मंत्रालय पीएम केअर फंडाला 151 कोटी रुपये देत आहे. ही गुंतागुंत जरा सोडवून द्या, असा टोलाही त्यांनी रेल्वे मंत्रालयाला हाणला आहे.
नवी दिल्लीः लॉकडाऊनच्या काळात परराज्यातील मजूर आणि कामगारांना घरी परतण्यासाठी रेल्वेकडून विशेष ट्रेन सोडण्यात येत आहेत. रेल्वेकडून विशेष ट्रेननं प्रवास करणाऱ्या या मजूर आणि कामगारांकडून तिकिटाचे पैसे आकारले जाणार आहेत. त्याच मुद्द्यावरून आता सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. एकीकडे सोनिया गांधींनी मजुरांच्या तिकिटाचा खर्च काँग्रेस उचलणार असल्याचं जाहीर केले असतानाच राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. रेल्वे इतर राज्यात अडकलेल्या मजुरांकडून तिकीट भाडे आकारत आहे, तर दुसरीकडे रेल्वे मंत्रालय पीएम केअर फंडाला 151 कोटी रुपये देत आहे. ही गुंतागुंत जरा सोडवून द्या, असा टोलाही त्यांनी रेल्वे मंत्रालयाला हाणला आहे.
राहुल गांधींच्या काही वेळापूर्वीच सोनिया गांधींनीही मोदी सरकारवर टीका केली होती. रेल्वेनं घरी परतणाऱ्या देशाच्या विविध भागात अडकलेल्या स्थलांतरित मजुरांकडून तिकिटांचे पैसे आकारणं दुःखद असल्याचं सोनिया गांधी म्हणाल्या होत्या. तसेच तो खर्च आता काँग्रेस उचलणार असल्याचंही त्यांनी जाहीर करून टाकलं होतं. त्यानंतर आता राहुल गांधींनी रेल्वे मंत्रालय पीएम केअर्स फंडाला करत असलेल्या मदतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
रेल्वे मंत्रालय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पीएम केअर्स फंडाला 151 कोटी देऊ शकतो, तर मजूर आणि कामगारांना विनातिकिटाची सुविधा का उपलब्ध करून देत नाही?, असा सवालच राहुल गांधींनी विचारला आहे. सोनिया यांनी निवेदनात म्हटले आहे की, मजूर आणि कामगार हा देशाचा कणा आहेत. त्यांची मेहनत आणि त्याग हा राष्ट्र उभारणीचा पाया आहे. अवघ्या चार तासांच्या सूचनेवर लॉकडाऊनमुळे लाखो मजूर व कामगारांना घरी परतण्यास नकार देण्यात आला. 1947च्या फाळणीनंतर देशात प्रथमच हजारो मजूर व कामगारांना शेकडो किलोमीटर चालत घरी परत जावे लागल्याचं चित्र पाहिल्याचं सोनिया गांधींनी सांगितलं. त्यांच्याकडे रेशन नाही, पैसे नाहीत, औषधे नाहीत, साधन नाही, पण फक्त परत गावी परत जाण्याची आस आहे.एक तरफ रेलवे दूसरे राज्यों में फँसे मजदूरों से टिकट का भाड़ा वसूल रही है वहीं दूसरी तरफ रेल मंत्रालय पीएम केयर फंड में 151 करोड़ रुपए का चंदा दे रहा है।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 4, 2020
जरा ये गुत्थी सुलझाइए! pic.twitter.com/qaN0k5NwpG
आरोग्य सेतू अॅपवर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
यापूर्वी राहुल गांधी यांनी केंद्र सरकारने चालवलेल्या आरोग्य सेतू अॅपवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. राहुल गांधी यांनी ट्विट केले होते की, "आरोग्य सेतू ऍप ही एक अत्याधुनिक देखरेखीची प्रणाली आहे, जी खासगी ऑपरेटरद्वारे चालवली जाते. यात संस्थात्मक देखरेखीची कोणताही आढावा घेतला जात नसून फक्त नागरिकांची माहिती मिळवली जात आहे. त्यांनी लिहिले, या अॅपसंदर्भात गंभीर डेटा सुरक्षा आणि गोपनीयता विषयक चिंता आहेत, तंत्रज्ञान आम्हाला सुरक्षित ठेवण्यात मदत करू शकते, परंतु वापरकर्त्याच्या संमतीशिवाय नागरिकांची माहिती मिळवणं योग्य नाही. भीतीच्या नावावर चुकीचा फायदा घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी मोदी सरकारवर केला आहे.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus: घरी परतणाऱ्या मजुरांचा खर्च उचलणार काँग्रेस, सोनिया गांधींची मोठी घोषणा
Coronavirus: कोरोना लसीच्या आम्ही एकदम जवळ; डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितली 'वेळ'
होय, ते परत येताहेत; पण तिरंग्यात लपेटून; शहीद कर्नल शर्मा यांच्या पत्नीची आर्त भावना
... तर लॉकडाऊनचे नियम मोडून आम्ही रस्त्यावर उतर, खासदार जलील यांचा इशारा
एन्काऊंटरवेळी कर्नलच्या फोनवर दहशतवाद्यांनी म्हटलं अस्सलाम वालेकुम; अन्...