CoronaVirus News: लॉकडाऊनचा निर्णय मोदींच्या अहंकाराचा परिणाम -राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 03:24 AM2020-06-16T03:24:33+5:302020-06-16T03:26:34+5:30

अज्ञानापेक्षा एक बाब धोकादायक आहे ती म्हणजे अहंकार

CoronaVirus Rahul Gandhi targets government over lockdown stages | CoronaVirus News: लॉकडाऊनचा निर्णय मोदींच्या अहंकाराचा परिणाम -राहुल गांधी

CoronaVirus News: लॉकडाऊनचा निर्णय मोदींच्या अहंकाराचा परिणाम -राहुल गांधी

Next

- शीलेश शर्मा 

नवी दिल्ली : देशात कोरोनाला रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या प्रकारे लॉकडाऊन लागू केले त्यावरून काँग्रेस सातत्याने मोदी सरकारवर टीका करीत आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी लॉकडाऊन लागू करण्याची पद्धत वेडेपणा असल्याचेही म्हटले होते. राहुल गांधी यांनी सोमवारी पुन्हा एकदा टष्ट्वीट करीत अल्बर्ट आइन्स्टाइनचे वाक्य लिहिले आहे की, हे लॉकडाऊन सिद्ध करते की, अज्ञानापेक्षा एक बाब धोकादायक आहे ती म्हणजे अहंकार. राहुल गांधी यांचा इशारा मोदी यांच्याकडे होता.

राहुल गांधी यांनी टष्ट्वीटमध्ये मोदी यांच्या नावाचा उल्लेख केला नाही. मात्र, तसा इशारा करीत स्पष्ट केले की, हा व्यंग बाण कुणावर सोडला आहे.
राहुल गांधी यांनी टष्ट्वीटसोबत एक ग्राफही दिला आहे. यात दिसून येते की, जेव्हापासून लॉकडाऊन लागू केले आहे देशाची अर्थव्यवस्था सातत्याने घसरत आहे. दुसरीकडे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. यातून राहुल गांधी हे सिद्ध करु इच्छितात की, कोरोनावर अंकुश लावण्यासाठी लॉकडाऊन लागू केले. पण, कोरोना कमी होण्याऐवजी वेगाने वाढत आहे.

अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी ज्या प्रकारे व्यवहार सुरु करण्यात आले त्यानंतरही अर्थव्यवस्था घसरत आहे. याचा थेट अर्थ असा आहे की, ना माया मिळाली ना राम. राहुल गांधी आणि पक्षातील त्यांचे समर्थक भलेही हल्लाबोल करत असतील. पण, पक्षात वरिष्ठ नेत्यांचा असाही एक वर्ग आहे, जो या काळात मोदींवर टीका करण्याच्या बाजूने नाही.

इंधनाच्या दरवाढीवरून राहुल गांधी आक्रमक
कच्चे तेल मंदीला तोंड देत असतानाही मोदी सरकार पेट्रोल
आणि डिझेलचे भाव वाढवत असल्याबद्दल काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आघाडी उघडली आहे. राहुल गांधी सोमवारी मोदी यांच्यावर टिष्ट्वटरवर दुसऱ्यांदा हल्ला केला.
त्यांनी म्हटले की,‘लाज वाटू द्या, लुटारू सरकार.’ राहुल गांधी यांनी मनमोहनसिंग सरकार आणि मोदी सरकारमधील इंधनाच्या भावांचे तुलनात्मक आकडे देऊन सिद्ध केले की, जेव्हा कच्च्या तेलाचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारात १०७.०९ अमेरिकन डॉलर प्रति बॅरल होते तेव्हा मनमोहन सरकारने पेट्रोल ७१.४१ रूपये लिटर आणि डिझेल ५५.४९ रूपये प्रति लिटरच्या वर जाऊ दिले नाही.
मोदी पंतप्रधान झाल्यानंतर कच्च्या तेलाच्या भावात मंदी आली आणि प्रति बॅरल ४०.६६ अमेरिकन डॉलरवर ते आले. परंतु, बाजारात पेट्रोल विकले गेले ७६.२६ व ७४.६२ रूपये लिटर. कारण मोदी सरकारने अबकारी कर पेट्रोलवर २५८.४७ टक्के व डिझेलवर ८१९.९४ टक्के आकारला आहे, असे गांधी म्हणाले.

गुजरातमध्ये पेट्रोल - डिझेल २ रुपयांनी महाग
गुजरात सरकारने पेट्रोल व डिझेलच्या दरात २ रुपयांची वाढ केली. उपमुख्यमंत्री नितीन पटेल म्हणाले, लॉकडाऊनमुळे महसूल घटला आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. येथे सध्या पेट्रोल ७१.८८ तर, डिझेल ७०.१२ रुपये झाले.

Web Title: CoronaVirus Rahul Gandhi targets government over lockdown stages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.