जयपूर : देशासमोर कोरोना व्हायरसचे मोठे संकट उभे ठाकले आहे. कोरोनाच्या परिस्थितीशी सामना करण्यासाठी विविध राज्यांत सरकार आणि आरोग्य प्रशासनाकडून युद्ध पातळीवर काम सुरू आहे. दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त असलेल्या राज्यांपैकी राजस्थानमधील रूग्ण वेगाने बरे होत आहेत.
राजस्थानमध्ये जवळपास 47.4% रुग्ण बरे झाले आहेत. दुसऱ्या स्थानकांवर तामिळनाडू असून येथील कोरोनाचे 39.69% रुग्ण बरे झाले आहे. त्यापाठोपाठ आंध्र प्रदेशातील रुग्ण बरे होत आहेत. 31.76% रुग्ण आंध्र प्रदेशात झाले आहे. तर मध्य प्रदेश 29.1 टक्के रुग्ण बरे झाले आहेत.राजस्थानमध्ये 22 एप्रिलपर्यंत एकूण 1517 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. 6 मे पर्यंत फक्त1614 अॅक्टिव्ह (जे रूग्णालयात दाखल आहेत) आहेत. बाकीचे रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर 15 दिवसांत केवळ 97 रुग्ण वाढले आहेत.
राजस्थानात 5 जिल्हे कोरोनामुक्त झाले आहेत. चुरू, झुंझुनू, सवाई माधोपूर, करौली आणि हनुमानगड या जिल्ह्यांत एकही कोरोनाची रुग्ण आढळला नाही. तर नागौर आणि अजमेरमधील कोरोनीची स्थिती सुधारत आहे. नागौरमध्ये 119 पैकी 66 रुग्ण सध्या अॅक्टिव्ह आहेत. तर अजमेरमध्ये 181 पैकी 130 जणांवर अद्याप उपचार सुरू आहेत. या दोन ठिकाणी हॉट स्पॉट जिल्ह्यांमधील रिकव्हरीचा दर सर्वात कमी आहे.
दरम्यान, बुधवारी राज्यात जयपूर, जोधपूर, सवाईमाधेपूर आणि करळी येथे प्रत्येकी एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला. तर 159 नवे रुग्ण आढळले. आतापर्यंत राज्यात एकूण 3317 कोरोनाचे रुग्ण आहे. तर 93 जणांचा मृत्यू झाला आहे.