नवी दिल्ली - चीनच्या वुहान शहरातून वेगाने पसरलेल्या कोरोनाने जगातील अन्य देशात शिरकाव केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने लोकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. याच दरम्यान जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्यात आली आहेत. मात्र इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांच्या सोयीसाठी कंट्रोल रुम सुरू करण्यात आले आहे. मात्र कंट्रोल रुमला फोन करून काही जण त्रास देत असल्याची माहिती समोर आली आहे. फोन करून मस्करी करणं एकाला चांगलचं महागात पडलं आहे.
कंट्रोल रुमला एकाने घरातून फोन करून चार समोसा भिजवा दो असं सांगत मस्करी केली. मात्र त्याची ही मस्करी त्याच्या अंगलट आली आहे. पोलिसांनी फोन करण्याला चांगलीच अद्दल घडवली असून नाला साफ करण्याचं काम दिलं आहे. उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यात लॉकडाऊनच्या दरम्यान एका व्यक्तीने कंट्रोल रूमला फोन केला आणि चार समोसा भिजवा दो असा थेट पोलिसांनाच आदेश दिला. पोलिसांनी हा फोन करणाऱ्याचा शोध घेतला आणि रात्रीच त्याला शोधून काढलं. त्याला नाला साफ करण्याचं काम दिलं आणि त्याच्याकडून नाला साफ करून घेतला. रामपूर जिल्हाधिकाऱ्यांनी ट्विटरवरून याबाबत माहिती दिली आहे.
जगभरात कोरोनाने थैमान घातले असून जगभरात भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनामुळे भारतात 20 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर कोरोनाग्रस्तांचा आकडा 1000 वर पोहोचला आहे. देशात 21 दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये पुढे वाढ करण्यात येईल, याबाबतचे वृत्त केंद्र सरकारने फेटाळले असून त्या केवळ अफवा असल्याचे म्हटले आहे. या बातम्यांना कुठलाही आधार नाही, असे सरकारनने स्पष्ट केले आहे. पीआयबीच्या ट्टविटनुसार, कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी या वृत्ताचे खंडन केले आहे. सरकारकडून तसा कुठलाही प्रयत्न नसून या बातम्या वाचून मी स्वत: चिंताग्रस्त आहे. मीडिया आणि सोशल मीडियावर लॉकडाऊन वाढविण्यात येत असल्याच्या अफवा पसरल्या आहेत. मात्र, हे वृत्त निराधार असल्याचे गौबा यांनी म्हटलंय. यापूर्वी एएनआय या वृत्तसंस्थेनीही या वृत्ताचे खंडन केले होते.
कोरोनाशी लढण्यासाठी पोलीस देखील अहोरात्र काम करत आहेत. लॉकडाऊनमध्ये ड्यूटीवर पोहोचण्यासाठी एका पोलीस कॉन्स्टेबलने तब्बल 450 किमी पायी प्रवास केल्याची कौतुकास्पद गोष्ट समोर आली आहे. चालून, चालून पाय सूजले मात्र तरीही ते कामावर हजर झाले आहेत. दिग्विजय शर्मा असं पोलीस कॉन्स्टेबलचं नाव असून सर्वांनी त्यांच्या जिद्दीला सलाम केला आहे. दिग्विजय राजगढ जिल्ह्यातील पचोर ठाण्यात काम करतात. काही दिवसांपूर्वी ते सुट्टीवर गेले होते. मात्र त्यानंतर देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. सर्व वाहतूक व्यवस्था बंद असल्याने त्यांनी पायीच कामावर जाण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी तब्बल 450 किमी अंतर पायी प्रवास केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : ...म्हणून मोबाईल सेवा निशुल्क करा, प्रियंका गांधींचं टेलिकॉम कंपन्यांना आवाहन
Coronavirus : 'भारतात फक्त 21 नव्हे तर 49 दिवसांचा लॉकडाऊन आवश्यक'
Coronavirus: कोरोनाशी लढण्यासाठी Googleचा पुढाकार, सुंदर पिचाईंनी केली 5,900 कोटींची मदत
Coronavirus: चिंताजनक! भारतात कोरोनाचा धोका वाढला; महाराष्ट्रात ५ दिवसात आढळले १०० नवे रुग्ण