नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनचा कालावधी ३ मे पर्यंत वाढविल्याने देशाच्या अर्थकारणावर मोठा परिणाम होणार आहे. २० एप्रिलनंतर काही उद्योगांना परवानगी देण्यात येणार आहे. पहिल्या लॉकडाऊन काळात आरबीआयने रेपो दरात कपात करत ईएमआयमध्ये सूट देण्याचीही विनंती केली होती. आज पुन्हा गव्हर्नर शक्तीकांत दास सकाळी १० वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत.
दास हे कोरोना संकटापासून अर्थव्यवस्थेला वाचविण्यासाठी आज काही घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यांनी २७ मार्चलाही अशाप्रकारचा दिलासा दिला होता. ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पत्रकारांशी बोलणार आहेत.
कोरोनामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. लॉकडाऊनमुळे जवळपास सर्व व्यवसाय बंद आहेत. यामुळे देशाला दररोज ३५ हजार कोटींचे नुकसान सहन करावे लागत आहे. लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यामध्ये देशाच्या विकास दराला ८ लाख कोटींचा फटका बसला होता. जगभरातील अर्थव्यवस्थांना कोरोनाच फटका बसला असून त्या देशांप्रमाणेच रिझर्व्ह बँकही उपाययोजना करत आहेत.
आनंदवार्ता! ६ भारतीय कंपन्यांनी कोरोनावर औषध शोधले; रुग्णांवर परीक्षण सुरु
आजचे राशीभविष्य - 17 एप्रिल 2020
CoronaVirus शाहीन बाग बनला कोरोनाचा नवा हॉटस्पॉट; दिल्लीमध्ये 24 तासांत ६२ नवे रुग्ण