अहमदाबाद : कोरोना विषाणूमुळे पसरलेल्या साथीची धास्ती घेऊन खासगी डॉक्टरांनी बंद ठेवलेले दवाखाने, रुग्णालये त्यांनी दोन दिवसांच्या आत पुन्हा सुरू करावेत; अन्यथा त्यांचे परवाने रद्द करण्यात येतील, असा इशारा अहमदाबाद महापालिकेने बुधवारी दिला आहे. तशा नोटिसाही डॉक्टरांना पाठविण्यात आल्या आहेत.
संसर्ग झालेल्यांवर उपचार करताना खूप दक्षता घ्यावी लागते. त्यासाठी पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्युपमेंट (पीपीई) तसेच आणखी काही साधनांची डॉक्टर, वैद्यकीय कर्मचाऱ्यांना गरज असते. या साधनांची टंचाई व ‘कोविड-१९’मुळे जिवाला असलेला धोका अशी कारणे पुढे करत अहमदाबादमधील खासगी डॉक्टरांनी आपले दवाखाने, रुग्णालये सध्या बंद ठेवली आहेत.
अहमदाबाद शहरामध्ये रुग्णांची संख्या वाढत असून रुग्णालयांच्या अपुºया संख्येमुळे उपचारास विलंब होत आहे. सरकारी रुग्णालयांतील खाटांची संख्या तसेच रुग्ण सामावून घेण्याची मर्यादित क्षमता लक्षात घेता ‘कोविड-१९’च्या रुग्णांवर खासगी रुग्णालयांनीही उपचार करणे आवश्यक आहे. मात्र, तसे होताना दिसत नाही.हॉटेलमध्येही उपचार विचाराधीनशहरातील थ्री स्टार हॉटेल तसेच ५० एसी रूम असलेली हॉटेल काही काळ ताब्यात घेऊन तिथेही रुग्णांवर उपचाराची सुविधा उभारण्याचा महापालिकेचा विचार आहे. खासगी डॉक्टरांनी दवाखाने पुन्हा सुरू करावेत, अशी गुजरात सरकारने वारंवार केलेली विनंती पूर्वी धुडकावून लावण्यात आली होती.लॉकडाऊन लागू झाल्यानंतर अहमदाबादमधील काही खासगी डॉक्टरांनी दवाखाने बंद ठेवले आहेत. मात्र, आता नियमांचा बडगा उगारून अहमदाबाद महापालिकेने ९ खासगी रुग्णालयांना या रुग्णांवर उपचार करण्यास भाग पाडले आहे. या रुग्णालयांमध्ये सुमारे हजार रुग्ण सामावून घेण्याची क्षमता आहे.