CoronaVirus: कुठे हवन तर कुठे जलार्पण; अंधश्रद्धेचा वेढा असताना कसा जिंकणार कोरोनाविरुद्धचा लढा?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 04:03 PM2021-05-13T16:03:19+5:302021-05-13T16:08:22+5:30
CoronaVirus: कोरोना जावा यासाठी होमहवन, जलार्पण यांसारख्या गोष्टी सर्रासपणे होताना दिसत आहेत.
नवी दिल्ली: देशात कोरोनाचे थैमान सुरू आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढत दिसून येत असून, कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या उच्चांक गाठत आहे. देशातील परिस्थिती चिंताजनक होत चालली आहे. यातच कोरोना लस, ऑक्सिजन, रेमडेसिवीर, बेड्स यांचा मोठा तुटवडा जाणवत आहे. मात्र, कोरोनाविरोधातील लढाईत अंधश्रद्धांचे प्रमाणही वाढताना दिसत आहे. कोरोना जावा यासाठी होमहवन, जलार्पण यांसारख्या गोष्टी सर्रासपणे होताना दिसत आहेत. (coronavirus rituals hawan pooja and different tactics rural areas on corona situation)
देशात कोरोनाची दुसरी लाट हाहाःकार माजवत असताना, तिसऱ्या लाटेचा इशाराही तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. कोरोनाविरुद्ध देशभरात लढाई सुरू आहे. डॉक्टर्स, नर्स, आरोग्य कर्मचारी दिवस-रात्र मेहनत घेत आहेत. परंतु, ग्रामीण भागात परंपरा, होमहवन, जलार्पण तसेच अनेकविध क्लृप्त्या करून कोरोनावर मात करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
दिलासा! सीरम आणि भारत बायोटेकने कंबर कसली; महिन्याला १७.८ कोटी लसींचे उत्पादन
मध्य प्रदेशात हवनकुंड फिरवला
कोरोनाचा फैलाव ग्रामीण भागात अधिक प्रमाणात होताना पाहायला मिळत आहे. ग्रामीण भागात स्थानिक पातळीवर धार्मिक मान्यतांवर विश्वास ठेवून उपाय केले जात असल्याचे पाहायला मिळत आहे. मध्य प्रदेशातील राजगड येथे ट्रॉलीवर एक हवनकुंड तयार करण्यात आले. त्यात आहुती देत हा हवनकुंड संपूर्ण भागात फिरवण्यात आला. असे केल्याने वातावरण शुद्ध होते आणि जंतूंचा नाश होतो, अशी मान्यता असल्याचे यावेळी सांगितले गेले.
परदेशातून आलेल्या मदतीचे सर्व राज्यांना समान वाटप शक्य नाही; नीती आयोगाची कबुली
घराघरात हवन करण्याचे आवाहन
हरियाणामधील झज्जर येथेही असाच प्रकार झाल्याचे समोर आले आहे. गावकऱ्यांनी होमहवन करत लोबान आणि अन्य गोष्टी एकत्र करून त्याचा धूप करण्यात आला आहे. तो परिसरात फिरवण्यात आल्याची माहिती मिळआली आहे. तसेच एका ट्रॅक्टर-ट्रॉलीतही हवनकुंड तयार करून तो गावभर फिरवण्यात आला. तसेच घराघरात हवन करण्याचे आवाहन करण्यात आल्याचे समजते.
आता भारतात होणार जॉन्सन अँड जॉन्सन लसीचं उत्पादन!; चाचपणी सुरू
उत्तर प्रदेशातही होमाचे अनुष्ठान
विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलातर्फे उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथे हवन करून तो परिसरात फिरवण्यात आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हवनाच्या धुरामुळे वातावरण शुद्ध होते. असे केल्याने कोरोनाला मात देता येऊ शकेल, असा दावा बजरंग दलाचे संयोजक विकास त्यागी यांनी केला आहे. तसेच महाराजगंज येथील ग्रामीण भागात ९ दिवस ९ अनुष्ठान करण्यात आले. सर्व गावकऱ्यांनी सूर्याला अर्घ्य देऊन कोरोनातून दिलासा मिळण्यासाठी प्रार्थना केली.
“पंतप्रधान मोदी खूप मेहनत घेतायत, कोरोनाच्या संकटसमयी संयमाने काम करतायत”
दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत कोरोनामुळे ४१२० जण मृत्युमुखी पडले आहेत. याच कालावधीत आणखी ३,६२,७२७ जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे कोरोनाबाधितांची एकूण संख्या २,३७,०३,६६५ झाली आहे. देशातील सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या ३७ लाख १० हजार ५२५ इतकी आहे. देशामध्ये एकूण १७ कोटी ७२ लाख १४ हजार २५६ जणांचं लसीकरण करण्यात आले आहे.