नवी दिल्ली – जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 3,79,080 पोहोचली आहे. कोरोनामुळे 185 हून अधिक देश प्रभावित झाले असून मृत्यूची संख्या 16,524 वर पोहोचली आहे. 1,02,423 रुग्ण हे बरे झाले आहेत. भारतात कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 500 वर पोहोचली आहे. भारतातील अनेक राज्यांत लॉकडाऊन करण्यात आले आहे. देशावर कोरोनाचे संकट ओढावलेलं असताना तामिळनाडू सरकारने एक मोठी घोषणा केली आहे. या राज्यातील नागरिकांना 1 हजार रुपये मिळणार आहेत.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी यांनी मंगळवारी (24 मार्च) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची घोषणा केली आहे. राज्यातील सर्व रेशनकार्ड धारकांना 1 हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच मोफत तांदूळ, साखर आणि अन्य जीवनावश्यक वस्तू देण्यात येणार आहेत. लांब रांगा टाळण्यासाठी टोकनच्या आधारावर या वस्तू देण्यात येतील अशी माहिती मुख्यमंत्र्यानी दिली आहे. एका इंग्रजी वृबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 500 वर गेली आहे. देशातील 30 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात संपूर्णत: 'लॉकडाऊन' घोषित करण्यात आला आहे. मात्र अद्यापही अनेकांना परिस्थितीचं गांभीर्य समजलेलं नाही म्हणूनच भारतीय रेल्वेने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेण्याचे नागरिकांना आवाहन केले आहे. भारतीय नागरिकांना केलं आहे. ‘भारतीय रेल्वे युद्धाच्या काळातही कधी थांबली नव्हती. त्यामुळे कृपया परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घ्या आणि घरीच थांबा’ असं ट्विट रेल्वेने केलं आहे. रेल्वेचं हे ट्विट अनेकांनी रिट्विट केलं आहे.
देशाच्या इतिहासात प्रथमच प्रवासी रेल्वे थांबविण्यात आली आहे. सर्व रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. फक्त मालगाड्या चालविण्यास परवानगी आहे. त्यामुळे रेल्वेने लोकांना घरामध्येच राहण्याचे आवाहन केले आहे.भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही दिवसागणिक वाढत आहे. देशभरात एका दिवसात कोरोनाचे नवीन 103 रुग्ण समोर आले आहेत. तसेच या रोगानं आतापर्यंत 10 जणांना जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : ‘…तेव्हाही रेल्वे बंद केली नव्हती, परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घ्या’
Coronavirus : महाराष्ट्रासह देशातील ‘या’ 30 राज्य-केंद्रशासित प्रदेशात 'लॉकडाऊन'
Coronavirus : कोरोनाला रोखणं आता तुमच्या हाती! WHO ने केलं भारताचं कौतुक