शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
3
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
4
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
5
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
6
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
7
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
8
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
9
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
10
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
11
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
12
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
13
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
14
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
15
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
16
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
17
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
18
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
19
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
20
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती

Coronavirus: मजुरांच्या परतीसाठी ३४ गाड्यांवर २४ कोटींचा खर्च; केरळ सरकारने केल्या ३ गाड्या रद्द 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2020 11:18 PM

केंद्र सरकार व भाजपने ८५ टक्के खर्च रेल्वे आणि १५ टक्के संबंधित राज्य सरकार उचलणार असल्याने मजुरांचा प्रवास मोफतच होणार आहे, असा दावा केला होता.

नवी दिल्ली : कोरोना विषाणूमुळे ओढवलेल्या संकटाच्या काळात देशभरातील विविध शहरात अडकून पडलेल्या स्थलांतरित मजुरांना आपापल्या मूळगावी परत जाता यावे, यासाठी रेल्वे मंत्रालयाने विशेष श्रमिक एक्स्प्रेस सोडल्या होत्या. या गाड्यांवर ३ मेपर्यंत रेल्वेला सुमारे २४ कोटी रुपये खर्च आला आहे. यातील २० कोटींचा खर्च रेल्वे उचलणार आहे, अशी माहिती वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने दिली.३ मेपर्यंत रेल्वेने अशा एकूण ३४ विशेष गाड्या सोडल्या आहेत. या गाड्यांचा उरलेला खर्च संबंधित राज्य सरकारांनी उचलावयाचा आहे. या मजुरांना घरी पाठविण्याचा मुद्दा समोर येताच हा प्रवास खर्च कुणी करायचा, यावरून वादाला तोंड फुटले होते. हा खर्च मजुरांना भरायला लागू नये, असा सगळ्यांचा सूर होता. काँग्रेस पक्षाने तर आपल्या राज्यांमधील प्रदेश संघटनांना मजुरांच्या प्रवासाचा खर्च उचलण्यास सांगितले होते.केंद्र सरकार व भाजपने ८५ टक्के खर्च रेल्वे आणि १५ टक्के संबंधित राज्य सरकार उचलणार असल्याने मजुरांचा प्रवास मोफतच होणार आहे, असा दावा केला होता.पहिली रेल्वे गाडी १ मे रोजी १ हजार २२५ मजुरांना घेऊन तेलंगणहून झारखंडला रवाना झाली होती. येत्या काही दिवसांतही मजूर मोठ्या प्रमाणावर आपापल्या गावाकडे जाणार असल्याने याचा मोठा खर्च रेल्वेला उचलावा लागणार आहे.बिहारसाठीच्या ३ गाड्या केरळ सरकारकडून रद्दतिरूअनंतपूरम : बिहारच्या स्थलांतरित मजुरांना परत नेण्यासाठी निश्चित केलेल्या तीन रेल्वेगाड्या केरळ सरकारने मंगळवारी रद्द केल्या. इतक्या मोठ्या संख्येने परतणाºया मजुरांची संख्या पाहता त्यांची आरोग्य तपासणी करण्यात बिहार सरकारने असमर्थता दाखवल्याने केरळ सरकारने हा निर्णय घेतला.

या तिन्ही रेल्वे बिहारच्या दरभंगा, दानापूर आणि मुझफ्फरपूर या जिल्ह्यात जाणार होत्या. मजुरांच्या याद्या बनवून सर्व तयारी पूर्ण करण्यात आली होती; परंतु बिहार सरकारने आयत्या वेळी कारणे पुढे केल्याने या गाड्या रद्द केल्या आहेत.

या विशेष गाड्या कोळीकोडे, अलापुल्ला आणि तिरूर या जिल्ह्यातून सोडल्या जाणार होत्या. मूळगावी परतणाºया मजुरांना कोणतीही लागण झाली नसल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र द्यावे लागते. जिथे परतणार आहे, त्या राज्याचे ना हरकत प्रमाणपत्रही निघण्यापूर्वी मिळणे आवश्यक असते. तिथे परतल्यानंतर मजुरांची पुन्हा तपासणी करून घरी पाठवायचे की क्वारंटाईन कक्षात ठेवायचे, हा निर्णय संबंधित राज्य सरकारने घ्यायचा असतो, अशी माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली. अनेक राज्यांतून हे श्रमिक येणार आहेत. त्यातून कोरोना विषाणूंचा संसर्ग वाढू नये, यासाठी बिहार सरकारने आता क्वारन्टाइनची मुदत १४ ऐवजी २१ दिवस करण्याचा निर्णय मंगळवारी जाहीर केला. 

बिहार : प्रत्येक ट्रेनमधून परतत आहेत १२०० मजूरया मजुरांच्या तिकीट भाड्याच्या आकारणीवरून सध्या वाद सुरू आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी मजुरांच्या तिकीटापोटी आलेल्या खर्चाची प्रतिपूर्ती करून त्यांना मूळ गावी जाण्यासाठी प्रत्येकी ५०० रुपये देण्याची घोषणा केली आहे. मजुरांना परतण्यासाठी रेल्वेने विशेष गाड्या सोडणे सुरू केल्यापासून बिहारमध्ये प्रत्येक ट्रेनमागे सुमारे १२०० मजूर परतत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या