भारतात कोरोना व्हायरसची आतापर्यंत 1190 लोकांना लागण झाली आहे आणि दिवसेंदिवस हा आकडा वाढतच जात आहे. आतापर्यंत 32 लोकांचा जीव गेला आहे. पण भारतासाठी सर्वात मोठी चिंतेची बाब म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणावर जाणारे लोक आहेत. हे लोक भारतात कोरोनाचं संक्रमण वाढण्याचं मोठं कारण ठरू शकतात. जर हा व्हायरस भारतातील गावांमध्ये पोहोचला तर देशाची हालत खराब होईल असा इशारा देण्यात आलाय.
भारतातील गावांबाबतचा हा इशारा डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी बिजनेस टुडेशी बोलताना दिला. डॉ. स्वामीनाथन या वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मुख्य वैज्ञानिक आहेत. आधी त्या इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या प्रमुख होत्या.
(Image Credit : indiatoday.in)
डॉ. सौम्या यांनी सांगितले की, भारतासमोर सर्वात मोठी समस्या ही आहे की, भारतात सोशल डिस्टंसिंग होत नाही. एकाच घरात अनेक लोक राहतात आणि एकाच बाथरूमचा वापर करतात. याने कोणत्याही आजारांचं संक्रमण होण्याचा धोका वाढतो.
त्यामुळे सर्वात महत्वाचं हे आहे की, लोकांनी स्वच्छतेवर अधिक लक्ष द्यावं. व्यक्तिगत स्वच्छतेसोबतच सोशल डिस्टंसिंगचीही काळजी घ्या. सार्वजनिक ठिकाणांवर थुंकू नये. याने या व्हायरसा रोखण्यात मोठी मदत होईल.
(Image Credit : aljazeera.com)
डॉ. सौम्या यांनी चिंता व्यक्त केली की, जे लोक प्रवासी आहेत. मजूर आहेत. लॉकडाऊनमध्ये आपल्या घरी आणि गावाकडे निघाले आहेत. यांच्यामुळे व्हायरस पसरण्याचा धोका अधिक वाढतो. जर हे लोक गावांमध्ये पोहोचले आणि तिकडे कुणाला संक्रमण झालं तर समस्या अधिक वाढेल.
त्या म्हणाल्या की, जर संक्रमण गावांपर्यंत पोहोचला तर सरकारला टेस्टची संख्या वाढवावी लागेल. ती सुद्धा फार मोठ्या प्रमाणात. कारण हा व्हायरस लिंग, वय, धर्म, परिसर, देश, श्रीमंत, गरिब असा फरक करत नाही. याचं एकच काम आहे लोकांना मारणं.
डॉ. सौम्या म्हणाल्या की, भारत असो वा युरोप इतरही देश सध्या व्हायरससमोर झुकलेले आहेत. प्रत्येक देशात एक वेगळी समस्या आहे. कोणत्याही देशाला तीन पद्धतीने काम करावं लागेल. शॉर्ट टर्म, मीडियम टर्म आणि लॉन्ग टर्मच्या तयारीसाठी.
लॉकडाउन हटवल्यावर काय होईल यावर डॉ. सौम्या म्हणाल्या की, लॉकडाउननंतरही आपणं सोशल डिस्टंसिंगची काळजी घेतली पाहिजे. सार्वजनिक ठिकाणी गर्दी होता नये. समारंभ, सभा बंद असल्या पाहिजे.आता देशातील ग्रामीण भागांमध्ये जाऊन मोठ्या प्रमाणात टेस्ट केल्या गेल्या पाहिजे. जेणेकरून हे कळावं की, कोणती व्यक्ती कोणत्या शहरातून आली आणि ती व्यक्ती संक्रमित आहे की नाही.