नवी दिल्ली - कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. लॉकडाऊनच्या दरम्यान बँका आणि आवश्यक सेवा सुरू आहेत. एसबीआय, एचडीएफसी, कोटक महिंद्रा यासह काही बँका त्यांच्या ग्राहकांना कॅश डिलिव्हरी करण्याची सुविधा देत आहे. देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खातेधारकांसाठी आता एक खूशखबर आहे. कारण त्यांना बँकेने घरबसल्या काही सुविधा दिल्या आहेत.
स्टेट बँकेने आपल्या ग्राहकांसाठी एक नवी सुविधा सुरू केली आहे. याच्या माध्यमातून ग्राहकांना घरबसल्या आपल्या खात्यातील शिल्लक रक्कम आणि शेवटच्या पाच ट्रान्झॅक्शनची माहिती घेता येणार आहे. बँकेने यासाठी खास आयव्हीआर (IVR) सेवा सुरू केली आहे. तसेच SBI तुमच्या घरी कॅश पोहोचविण्याची सुविधा देते. एवढेच नाही तर एसबीआय तुमच्या घरी येऊन पैसे जमा करण्याचीही सुविधा देते. मेडिकल इमरजन्सीवेळी एसबीआय ग्राहकाला 100 रुपयांचे शुल्क आकारते. या सुविधेचा लाभ उठवून तुम्ही या वेगळ्या सेवेचा लाभ घेऊ शकता.
IVR सुविधेचा वापर कसा करायचा हे जाणून घ्या
- बँकेच्या कस्टमर कॉन्टॅक्ट सेंटरमध्ये 1800-425-3800 किंवा 1800-11-2211 वर फोन करा.
- तुम्हाला हवी असलेली भाषा निवडा.
- आपल्या रजिस्टर्ड बेस्ड क्रमांकाच्या सेवेसाठी 1 डायल करा.
- शेवटच्या पाच ट्रान्झॅक्शनसाठी पुन्हा 1 डायल करा.
- आयव्हीआरच्या माध्यमातून माहिती घेण्यासाठी 1 डायल करा किंवा एसएमएसद्वारे माहिती मिळवण्यासाठी 2 डायल करा.
IVR सुविधा केवळ एकच व्यक्ती वापरत असलेल्या बचत खातेधारकांसाठी आहे. तसेच यासाठी तुमचा मोबाईल क्रमांक एकाच खातेधारकाच्या नावावर रजिस्टर असणं गरजेचं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : डॉक्टरलाच झाली कोरोनाची लागण, 1000 रुग्णांना संसर्गाचा धोका
Coronavirus : बापरे! फक्त 20 मिनिटांत एका व्यक्तीमुळे 4 जणांना कोरोनाची लागण
Coronavirus : देशभरातल्या टोलनाक्यांवरील टोलवसुली स्थगित, नितीन गडकरींनी दिला मोठा दिलासा
coronavirus : लॉकडाऊनदरम्यान भाजपाने उचलले मोठे पाऊल, रोज पाच कोटी गरिबांना देणार भोजन