corona's Third wave: भारतात कोरोनाची दुसरी लाट (CoronaVirus second wave ) ही जुलैपर्यंत थांबेल आणि जवळपास सहा ते आठ महिन्यांनी पुन्हा कोरोना महामारीची तिसरी लाट (CoronaVirus third wave) येण्याची शक्यता आहे. हा अंदाज भारत सरकारच्या विज्ञान मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या विज्ञान आणि औद्योगिकी विभागाद्वारे स्थापन केलेल्या तीन सदस्यीय समितीने लावला आहे. केंद्र सरकारलाही याबाबत अलर्ट करण्यात आले आहे. (three scientiest told when corona second wave gone and third wave will come on SUTRA model study.)
SUTRA मॉडेलचा वापर करून हा अंदाज लावण्यात आला आहे. यानुसार वैज्ञानिकांनी ही भविष्यवाणी केली आहे. यामध्ये मेच्या अखेरीस आणि जूनच्या सुरुवातीला दररोज कोरोनाचे 1.5 लाख रुग्ण सापडणार आहेत. जूनच्या शेवटी दररोज 20 हजार नवे कोरोनाबाधित सापडणार आहेत. तर जुलैपर्यंत कोरोनाची दुसरी लाट संपण्याची शक्यता आहे. (When corona Virus second wave will end in India?)
पॅनेलचे एक सदस्य आणि आयआयटी कानपूरचे प्रोफेसर मनिंद्र अग्रवाल यांनी सांगितले की, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, मध्ये प्रदेश, झारखंड, राजस्थान, केरळ, सिक्किम, उत्तराखंड, गाजरात आणि हरियाणाशिवाय दिल्ली आणि गोवा राज्यांमध्ये कोरोनाने उसळी घेतली आहे. तामिळनाडू मध्ये 29 ते 31 मे आणि पाँडिचेरीमध्ये 19-20 मे रोजी कोरोना डोके वर काढू शकतो.
पूर्व आणि पूर्वोत्तर राज्यांमध्ये सध्या कोरोनाचा पीक येणे बाकी आहे. आसाममध्ये 20-21 मे, मेघायल 30 मे, त्रिपुरा 26-27 मे पर्यंत कोरोनाचा कहर वाढू शकतो. हिमाचल प्रदेश आणि पंजाबमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होऊ लागली आहे. तिथे अनुक्रमे 24 मे आणि 22 मे रोजी पीक येऊ शकतो.
तिसरी लाट कधी?य़ा वैज्ञानिकांच्या अंदाजानुसार पुढील सहा किंवा आठ महिन्यांत कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. जर लसीकरण मोठ्या प्रमाणावर झाले तर ही लाट स्थानिक असणार आहे. यामुळे अनेक लोक प्रभावित होण्याची शक्यता कमी आहे. कमीतकमी ऑक्टोबर 2021 पर्यंत तिसरी लाट येणार नाही.
भारतात नव्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट, मात्र मृत्यूचं प्रमाण जगात सर्वाधिक : WHO
SUTRA मॉडेल हे एक गणितीय मॉडेल आहे जे कोरोना महामारीच्या तिव्रतेचा अंदाज लावण्यास मदत करते. गेल्या वर्षी पासून हे मॉडेल स्वीकारण्यात आले आहे. तसेच केंद्र सरकारला यावर अभ्यास करून अंदाज देत असते. मात्र, दुसरी लाट कधी येणार याचा अंदाज चुकल्याचे या समितीनेच मान्य केले होते. आयआयटी हैदराबादचे प्रोफेसर विद्यासागर यांनी म्हटले होते की, आम्हाला दुसऱ्या लाटेत 1.5 लाखांच्या आसपास रुग्ण सापडतील असे वाटले होते, मात्र तो अंदाज चुकला कोरोना लाट लवकर आली.