नवी दिल्ली - भारतात कोरोनाला आळा घालण्यासाठी व्यापक प्रयत्न करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आल्याची घोषणा केली. तसेच लोकांना घरातून बाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे. भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या 4000 वर पोहोचली असून हा आकडा सातत्याने वाढत आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात 14 एप्रिलपर्यंत 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मात्र देशात कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या पाहून लॉकडाऊन वाढवण्याची शक्यता आहे अशी चर्चा सुरू आहे.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी लॉकडाऊन वाढवण्याची गरज पडली तर परिस्थितीचा अंदाज घेऊन निर्णय घेऊ असं म्हटलं आहे. 'लोकांचा जीव हा खूप जास्त महत्त्वाचा आहे. अर्थव्यवस्था पुन्हा उभी करता येऊ शकते. मात्र लोकांचे जीव गेले तर ते कसे परत आणणार? त्यामुळे जर लॉकडाऊन वाढवण्याची गरज पडली तर परिस्थितीचा अंदाज घेऊन निर्णय घेऊ' असं शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे. मध्य प्रदेशमध्येही कोरोनाग्रस्तांची संख्या जास्त आहे.
भोपाळमध्ये मंगळवारी कोरोनाचे 12 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांचा आकडा 268 झाला आहे. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 नवीन रुग्णांपैकी सात पोलीस कर्मचारी आहेत तर पाच आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी लॉकडाऊनबाबत प्रतिक्रिया दिली आहे. लॉकडाऊनबाबत अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही. त्यामुळे त्याबाबत कुठलीही शक्यता वर्तवू नका, असे अग्रवाल यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : 'घरचे आजारी पडले तर...', कुटुंबीयांच्या आठवणीने डॉक्टरचे डोळे पाणावले
Coronavirus : फ्रान्समध्ये कोरोनाचा हाहाकार! 24 तासांत तब्बल 833 जणांचा मृत्यू
Coronavirus : सायकलसाठी जमा केलेल्या पैशांचा उपयोग भारी; 'या' चिमुकल्याची बातच न्यारी
Coronavirus : कोरोनाचा असाही फायदा! तब्बल 7 वर्षांनी कुटुंबियांना सापडला बेपत्ता मुलगा