नवी दिल्ली : जगभरात धुमाकूळ घातलेल्या कोरोना व्हायरसने आता भारतातही मूळ धरायला सुरूवात केली आहे. कोरोनाने दुसºया स्टेजमध्ये प्रवेश केल्याने शाळा, कॉलेज, मॉल बंद ठेवण्यासोबत सरकारी कार्यालये, खासगी कार्यालयामध्ये घरून काम करण्याची विनंती मोदी सरकारने केली होती.
केंद्रीय राज्यमंत्री व्ही मुरलीधरन हे 14 मार्चला त्रिवेंद्रममधील मेडिकल इन्स्टिट्युटमध्ये बैठकीसाठी गेले होते. यावेळी या बैठकीला स्पेनहून परतलेल्या एका डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने मुरलीधरन यांनी काळजी घेतली आहे. यामुळे परदेशातील मोठमोठ्या नेत््यांना कोरोनाची लागण झालेली असताना भारतातही राजकीय नेत्यांना व्हायरसने वेढले आहे.
मोदी सरकारमधील केंद्रीय राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी स्वत:ला कोरोना संशयित रुग्ण म्हणून घरीच व्कारनटाईन केले आहे. क्वारनटाईन म्हणजे संशयितास 14 दिवसांसाठी अन्य लोकांच्या संपर्कापासून लांब ठेवले जाते. जगभरात अनेक नेत्यांना, त्यांच्या कुटुंबीयांना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे हा आजार पसरू नये म्हणून मुरलीधरन यांनी काळजी घेतली आहे.
मुरलीधरण हे सध्या केरळमधील त्रिवेंद्रममध्ये असून तेथेच त्यांनी विलगीकरण केले आहे. दरम्यान, महारा़ष्ट्रामध्ये कोरोनामुळे पहिल्या रुग्णाचा मृृत्यू झाला असून देशातील एकूण मृत्यूंची संख्या तीन झाली आहे. तर शंभराच्यावर कोरोनाची लागण झालेले रुग्ण आढळले आहेत. केंद्र आणि राज्य सरकारांनी लोकांना गर्दीची ठिकाणे टाळण्याचे आदेश दिले असून मुंबई, पुण्यामध्ये जमाव बंदी आदे़श लागू करण्यात आले आहेत.
CoronaVirus : 'चीन'पुढे अमेरिकेने हात टेकले; मोठ्या मंदीच्या छायेत असल्याची ट्रम्प यांची घोषणा